Homeक्राईमMurder of Manika who went to leave : कारला कट मारल्याच्या कारणावरून...

Murder of Manika who went to leave : कारला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला; सोडायला गेलेल्या माणिकाचा खून

उस्माननगर, माणिक भिसे| मोकलेवाडी ता.लोहा. येथे कारला कट मारल्याचे क्षुलक कारणा वरुण झालेल्या हाणामारीत माणिका मोकले यांना जबर मार लागल्याने उपचारा दरम्यात मृत्यू झाला आहे. फिर्यादी नागेश माणिका मोकले यांचे फिर्यादी वरुण उस्माननगर पोलीस ठाण्यात दहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.१० फेब्रुवारी रोजी मोकलेवाडी ता.लोहा येथे माणिका मोकले गावातील हनुमान मंदीराजवळ भंडारा खाण्यासाठी गेले होते. यावेळी बाजुला अचानक आरडा ओरड झाल्याने सोडवण्यासाठी गेले असता आरोपी गंगाधर साहेबराव पारडकर, प्रज्वल संजय पारडकर, विजय साहेबराव पारडकर, यांनी हातातील लोखंडी रॉड, काटी, कोयत्याने, कु-हाडीने मारुण माणिका मोकले, गोविंद, पद्माकर, यांना जखमी केले. शासकिय दवाखान्यात उपचारा दरम्यान माणिका शेषराव मोकले वय ५५ वर्ष यांचा मृत्यू झाला आहे.

नागेश माणिका मोकले यांचे फिर्यादी वरुण गु.र.नं २६/२०२५ कलम १०३,(१) ११८(१) ,११५(२), १८९(२), १९१(३),१९० बी.एन.एस प्रमाणे आरोपी राम दत्ता पारडकर, गंगाधर साहेबराव पारडकर, प्रज्वल संजय पारडकर, विजय साहेबराव पारडकर, प्रसाद रावसाहेब पारडकर,गोविंद शंकर पारडकर, संजय संभाजी पारडकर, चंद्रकांत शंकर पारडकर,  साहेबराव संभाजी पारडकर, प्रथमेश संजय पारडकर, रामकिशन शिवबा आकले , सर्व राहणार मोकलेवाडी ता.लोहा. यांचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा आरोपिंना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी जगताप, आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास स.पो.उ.नि. गाडेकर हे करत आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments