Homeजिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत बहाद्दरपुरा येथील सद्गुरू मा.आदिवासी आश्रम शाळेचे घवघवीत यश -NNL

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत बहाद्दरपुरा येथील सद्गुरू मा.आदिवासी आश्रम शाळेचे घवघवीत यश -NNL

कंधार/सचिन मोरे। जिल्हा क्रीडा कार्यालय नांदेड तर्फे आयोजित नांदेड जिल्हा स्तरीय क्रिडा स्पर्धा 2022-23 या स्पर्धेत कै.उल्हास मेमोरियल ट्रस्ट कंधार संचलित सद्गुरु माध्यमिक आश्रम शाळेतील खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले.

कु. शारदा संतोष फोल या महिला खेळाडूंनी भालाफेक या क्रीडा प्रकारात 17 वर्षे वयोगटातुन जिल्ह्यातुन (प्रथम) क्रमांक पटकावला असून थाळी फेक 17 वर्ष वयोगटातुन कुमारी शारदा संतोष फोल या खेळाडूंनी जिल्ह्यातुन (द्वितिय) क्रमांक पटकावला आहे तसेच 100×400 मीटर धावने रिले स्पर्धेत 17 वर्ष वयोगटातुन जिल्ह्यातुन (द्वितिय) क्रमांक येण्याचा बहुमान अनुक्रमे कुमारी शारदा संतोष फोल , ऊर्मिला माणिक चिभडे , प्रियंका प्रकाश मोधे ,पायस गजानन भुरके यांनी पटकावला या सर्व खेळाडूची विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये साठी निवड झाली आहे.

या सर्व विजेत्या खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष भाई दत्तात्रय गुरुनाथराव कुरूडे सद्गुरु माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विशाल टेकाळे जाधव जी.डी अधिक्षक शेख के.एम. विनायक गव्हाणे सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments