Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Malegaon crowd stamped the popularity of Shankarpata : शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब -NNL
नांदेड महाराष्ट्र व्हिडीओ January 4, 2025

Malegaon crowd stamped the popularity of Shankarpata : शंकरपटाच्या लोकप्रियतेवर माळेगावच्या गर्दीचे शिक्कामोर्तब -NNL

हजारो शेतकऱ्यांनी अनुभवला ५८ बैल जोड्यांचा सहा तास थरार
NNL TeamBy NNL TeamJanuary 4, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| लाईन क्लिअर…जोडी सोडा… जोडी मालकासाठी खुशखबर… तीन सेकंद 38 पाँईट… आणि वायुगतीने …  विक्रमी वेळेत अंतर पार… पाठोपाठ शेतकऱ्यांच्या टाळ्या शिट्ट्या… अशा माळेगावच्या माळरानावरील धावत्या समालोचनात ५८ बैल जोड्यांनी डोळ्यांचे पारणे फेडणारा थरार रचला. शंकर पटाच्या गर्दीने हा खेळ तुफान लोकप्रिय असल्याचे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

शेती,मातीत रमणाऱ्या शेतकऱ्यांचा माळेगावचा शंकरपट म्हणजे जीव की प्राण. न्यायालयाच्या निर्णयानंतर गेल्या वर्षीपासून पुन्हा बैलगाड्यांच्या शर्यतीला सुरुवात झाली आहे. बंदी उठल्यावरचा आजचा माळेगावचा दुसरा शंकरपट. आज गर्दीचे सर्व उच्चांक मोडत माळेगावात मराठवाडा, विदर्भातील तसेच बाजूच्या राज्यातील शेतकऱ्यांनी या शंकरपाटासाठी गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून यासाठी बैलजोडी आल्या होत्या. त्यामुळे यंदाचा शंकरपठ अतिशय चुरशीचा गर्दीचा आणि उत्कंठेचा ठरला आहे. माळेगावात आज दुपारपासून 58 जोडीनी आपले कसब दाखविले. सायंकाळी साडेपाच पर्यंत हा थरार सुरू होता.

माळेगावच्या यात्रेला आज एक आठवडा झाला. 29 डिसेंबरच्या पालखी यात्रेनंतर सुरू झालेली माळेगावची यात्रा आज शंकर पटाने गाजवली उद्या माळेगाव यात्रेची आणखी एक परंपरा असणाऱ्या कुस्तीच्या फडाने शासकीय कार्यक्रमाची सांगता होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनीही आज शंकरपटाचा आनंद घेतला. त्यानंतर आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील यात्रेला भेट दिली.

तत्पूर्वी आज या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. आनंदराव बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, पोलीस अधिकारी अश्विनी जगताप, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, नरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, पोलीस निरीक्षक संजय नीलपत्रेवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजकुमार पडीलवार, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. दिनेश महेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डाॅ. प्रवीणकुमार घुले, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, सरपंच प्रतिनिधी हनुमंत धुळगंडे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, पंचायत समितीचे माजी सभापती आनंदराव शिंदे, अंबादास जाहागीरदार, अशोक मोरे, नरेंद्र गायकवाड, उद्धव शिंदे, विस्तार अधिकारी धनंजय देशपांडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रारंभी खंडोबाच्या प्रतिमेचे पूजन करून दुपारी एक वाजता शंकरपट शर्यतीला सुरुवात झाली. या शर्यतीसाठी नांदेडसह पालम, गंगाखेड, पूर्णा, परभणी, लातूर, अहमदपुर, हिंगोली आदी ठिकाणांहून 58 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. वेगवान धावणाऱ्या बैलजोड्यांनी उपस्थित लाखो प्रेक्षकांना अक्षरशः थक्क केले. शेतकऱ्यांसाठी ही स्पर्धा केवळ मनोरंजन नाही तर त्यांच्या मेहनतीचा व बैलांवरील प्रेमाचा सन्मान असल्याचे यावेळी एका शेतकऱ्यांनी बोलून दाखवले. पंच म्हणून जनार्दन मंदाडे व नागेश मंदाडे यांनी काम पाहिले. शंकरपटाचे पहिले पारितोषिक 31 हजार, द्वितीय 21 तर तृतीय पारितोषिक 11 हजार रुपये आहे.तसेच काही जणांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जातात.

शंकरपटाची प्रक्रिया – शर्यतीसाठी मैदानावर विशिष्ट अंतरावर दोन खांब लावले जातात. त्यावर धागे बांधलेले असतात. पहिला धागा तोडला की, वेळ मोजणारे घड्याळ सुरू होते आणि दुसरा धागा तोडला की वेळ थांबते. या दरम्यानची वेळ नोंदवली जाते. ज्या जोडीने सर्वात कमी वेळात अंतर पूर्ण केले ती जोडी विजयी ठरते.

रविवारी बक्षीस वितरण तसेच कुस्त्यांची दंगल – माळेगावला उद्या शासकीय कार्यक्रमांच्या आयोजनाचा समारोप होणार आहे. उद्या दुपारी माळेगाव येथे गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे तसेच उद्या कुस्तीची दंगल देखील पार पडणार आहे.

माळेगाव बैलगाडा स्पर्धेचे विजेते पुढीलप्रमाणे आहेत
१. महादू कोंडीबा रिटे पिंपळदरी तालुका औंढा जिल्हा हिंगोली ( ४.३० सेकंद )
2. साई संदीप घुगे सेलसुरा ( ४.३० सेकंद )
3. विठ्ठलराव कदम, आनंदराव चव्हाण, वसमत 4.36 सेकंद
4. विजय देवीसिंह राठोड, दगडघर 4.43 सेकंद
5. नितीन शंकरराव लांडगे, शिवपुरी 4.43 सेकंद
6. बालाजी विश्वनाथ गलांडे, मालेगाव 4.46 सेकंद
7. कोंडीबा पांडुरंग धोत्रे नाळेश्वर 4.49 सेकंद
8. आरिफ खान जुम्मा खाँ पठाण, फुलसावंगी 4.49 सेकंद
9. देवा किसन खर्डे चिंचगव्हाण 4.58 सेकंद
10. शिवप्रसाद रामराव मुलगीर पोतरा 4.59 सेकंद

Malegaon crowd stamped the popularity of Shankarpata
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTribute to Pradeep Naik : शिवणी येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी‌ वाहिली स्व. प्रदिप नाईक यांना श्रद्धांजली -NNL
Next Article Riot of wrestlers in Malegaon Yatra : माळेगाव यात्रेत 5 जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल ; विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Jyotiba Kharate : ज्योतिबा खराटे यांना मतदार संघातून लढण्याची हाक ; खराटे यांच्या निर्णयाकडे जनतेचे लक्ष -NNL

October 27, 2024

JEE, NEET, MHT-CET coaching : जेईई, नीट, एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना टँब व सिमकार्डचे वाटप – NNL

January 1, 2025

Badlapur school sexual assault incident protested ; बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचार घटनेचा महाविकास आघाडीकडून नांदेडमध्ये निषेध – NNL

August 24, 2024

Mp nagesh patil ashtikar ; खा.नागेश पाटील उद्या माहुर तालुक्याच्या दौऱ्यावर -NNL

September 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Accident news ; बिलोली पंचायत समिती समोर हायवाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

Raised the weapon : मानवी छळ प्रवृत्तींच्या विरोधात कवितेचे शस्त्र उगारले

50,000 reward for information about the killers of that name । त्या’ अनामिकेच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यास ५० हजाराचे बक्षीस -NNL

Manav Vikas Mission bus has provided : मानव विकास मिशनची बस सुरु झाल्याने घारापुर येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मिळाला आधार

assembly elections ; विधानसभा निवडणुकीतील ‌ यश अपयश नंतर काळे परिवाराच्या पुण्यतिथी निमित्ताने बोढांरकर व हंबर्डे एकत्र – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?