Monday, June 29

नगरेश्वर मुर्तीची आज प्राणप्रतिष्ठा सोहळा -NNL

नविन नांदेड। माता कन्यका परमेश्वरी मंदीर ट्रस्ट नविन नांदेडच्या वतिने श्री नगरेश्वर मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा१८ डिसेंबर २०२२ रोजी श्री राघवेंद्र स्वामी मठ शेजारील , यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पाठीमागे , सुभद्रा नगर वाघाळा येथे आयोजित करण्यात आला असून दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिडको-हडको परिसरातील नवीन नांदेड भागात प्रथमच श्री नगरेश्वर मंदीर निर्माण होत आहे व त्या मंदीरात श्री नगरेश्वर मुर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत आहे. कार्यक्रमाची रुपरेषा रविवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी१० ते १२ श्री नगरेश्वर मुर्तीची प्राणप्रतिष्ठा विधी पौरोहित्य श्री चेरेकर महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा विधी होणार आहे व यजमान श्री रामचंद्र मोदी हे आहेत.या सोहळ्यात प.पु.स्वामी प्रत्ययानंद सरस्वती प्रमुख आचार्य, चिन्मय मिशन,यांचे दुपारी १ ते २ सत्संग आहे.

या सोहळ्याला भाविक भक्तांनी व समाज बांधवांनी , परिसरातील नागरिकांनी ऊपसिथीत राहण्याचे आवाहन माता कन्यका परमेश्वरी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष आनंद बासटवार, उपाध्यक्ष प्रभाकर निलावार,सचिव राजेश्वर कमटलवार ,कोषाध्यक्ष रामचंद्र मोदी , सदस्य डॉ. नरेश रायेवार, सहसचिव अरुण दमकोंडवार, सदस्य व वासवी क्लब सिडको-हडको अध्यक्ष शिवानंद निलावार,सचिव बालाजी कवटीकवार,कोषाध्यक्ष संदीप येरावार,वासवी वनिता क्लब सिडको-हडको,वनिता वासवी क्लब,अध्यक्षा सौ.छाया शिवानंद निलावार,सचिव सौ. सुनिता बालाजी कवटीकवार,कोषाध्यक्षा सौ.कोमल संदीप येरावार व सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!