Thursday, May 14

चोरंबा येथे लपींग आजाराने दोन जणावरे दगावली -NNL

अर्धापूर| तालुक्यातील चोरंबा येथील एका शेतकऱ्यांचे गाय व गोरे लंपींग आजाराची लागण होऊन उपचाराअभावी मृत्यू पावले. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून,दोन मुक्या प्राण्यांना जीव गमावावा लागला आहे. परीसरात या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अर्धापूर तालुक्यात नव्याने समावेश झालेल्या चोरंबा (ना )येथील गजानन सुभाषराव लांडगे वय (४२) यांना ६६ आर जमीन आहे,शेतीला जोडधंदा म्हणून गाय,म्हैस शेतात होती,तर शेतीच्या कामासाठी गोरे होते. आजाराने ग्रस्त असल्याने या जनावरांना चाभरा येथे उपचार केले, निदान लागले नाही,अंगावर गाठी असल्याने लंपींग आजाराने गाय व गोरे याचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असून, दोन मुक्या प्राण्यांना जीव गमावावा लागला आहे.

याप्रकरणी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी लक्ष देऊन माहिती घेतली आहे.या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत संबंधित विभागाने करावी व परीसरात उपचार त्वरित करावेत अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे,या घटनेमुळे संबंधित अधिकारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!