नांदेडसोशल वर्क

Birsa Munda Jayanti ; मलकागुडा येथे बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी ;

श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे l माहूर तालुक्यात अनेक ठिकाणी जननायक भगवान बिरसा मुंडा यांची मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात असून मौजे मलकागुडा येथे काल दि.१७ नोव्हे रोजी बिरसा मुंडा जयंती साजरी करण्यात आली.यावेळी भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.   

इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरोधात आदिवासींना संघटित करून स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान भगवान बिरसा मुंडा यांनी दिले आहे.आदिवासी अस्मिता, आदिवासी संस्कृती आणि स्वायत्तता यांच्या रक्षणासाठी त्यांनी क्रांतीचे हत्यार उपसले. त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी उलगुलान चळवळ सुरू केली.त्यांच्या या सामाजिक कार्यांनी आज आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना दैवत म्हणून पुजतात, १५ नोव्हेबर हा जयंती उत्सव आदिवासी समाज मोठ्या उत्सहात साजरा करतात याचेच औचित्य साधून माहूर तालुक्यात अनेक ठिकाणी बिरसा मुंडा जयंती उत्सव विविध राजकीय पक्ष,विविध संघटनांनी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे.

IMG 20241117 WA0006 Birsa Munda Jayanti ; मलकागुडा येथे बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी ;

मलकागुडा येथे संपन्न झालेल्या जयंती कार्यक्रमा दरम्यान त्यांच्या ऐतिहासिक व स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला उपस्थित मान्यवरांनी उजाळा देवून त्यांच्या क्रांतिकारक विचारांचे स्मरण केले.या कार्यक्रमास विष्णु पडलवार,नितीन पाटील कन्नलवार,गजु पडलवार,सचिन पडलवार,किशोर आञाम,दशरथ आञाम,सुरेश मडावी,मनोज मारकवार,राजु गेडाम,शेशीकांत कन्नलवार तर आदिवासी समातील पुरुष व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

IMG 20241117 WA0005 Birsa Munda Jayanti ; मलकागुडा येथे बिरसा मुंडा जयंती मोठ्या उत्साहात साजरी ;

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!