लोहा| लोहा विधानसभा मतदार संघात गोधळाची परिस्थिती आहे. पण असा राजकीय स्थितीत महाराष्ट्र राज्य समितीचे संस्थापक माजी आ शंकर अण्णा धोंडगे हे काय निर्णय घेतात याकडे मतदार संघाचे लक्ष लागले असून त्याची भूमिका किंगमेकार अशी राहणार Urdu असा दावा धोंडगे समर्थकांनी केला आहे त्याच्या भूमिकेकडे मतदार संघाचे लक्ष लागले आहे.
लोहा कंधार तालुक्याच्या राजकारणात बहाद्दरपूऱ्यातील ज्या क्रांतिभुवनाने ७१वर्ष एक पक्ष ..एक झेंडा पहिला .. अनेक डावपेच अनुभवले..विजयाचा ३५ वर्ष गुलाल उधळला ..त्याच अंगणात आता विविध पक्ष .. व झेंडे उभे राहिले आहेत.प्रा पुरुषोत्तम धोंडगे यांनी जाहीर पाठिंबा शेका.पक्षाच्या उमेदवार आशाबाई शिंदे यांना दिला ..त्याची” शिट्टी “वाजणार की राजकीय फुरर ..फुरर ..होणार हे निकालानंतर स्पष्ट होईल तर दुसरीकडे उमेदवारी मागे घेतल्या नंतरही किंगमेकर भूमीकेत माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे आहेत त्यांनी आशा राजकीय गोधळाच्या परिस्थितीत शांत राहणे पसंत करत राजकीय” योग्य निर्णय अध्याप घेतला नाही त्याची निर्णायक बैठक दोन दिवसात अपेक्षित आहे.
१९९९पासून माजी शंकर अण्णा धोंडगे हे राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते राहिले आहेत.२००९मध्ये याच पक्षाकडून विजयी झाले होतें.२०२२मध्ये बीआरएस पक्षात प्रवेश करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शंकर अण्णा धोंडगे याना फोन करून शिवराज धोंडगे व दिलीपदादा या दोघांना आमच्या सोबत राहू देण्याचे बोलले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक जेष्ठ नेते शरदचंद्र पवार असो की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याच्याशी बाचोटीकरांचे स्नेहाचे संबंध आहेत. विशेषतः अजितदादा सोबत शिवराज पाटील व दिलीप दादा याचे या न त्या कारणास्तव जाणे सुरू असते. पण राजकीय संबंध त्यांनी वृद्धिंगत केले शिवाय या दोघा भावात राजकीय एकवाक्यत दिसते.माजी आ शंकर अण्णांच्या भूमिका म्हणजे आपली भूमिका असाच निर्णय या भावाचा असतो तर दुसरी कडे भाई धोंडगे यांच्या पश्वात जो वाद आणि वेगवेगळे झेंडे त्याच्या राजकीय वारसदारानी घेतले याची मतदार संघात “ते “आणि'” हे “अशीच चर्चा सुरू आहे .या सगळ्या राजकीय घडामोडीत शंकर अण्णा धोंडगे समर्थकांची बैठक होणार असून त्याच्या निर्णयाकडे मतदार संघ व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे