नांदेड| जो हिन्दु हित की बात करेगा वही देश पर राज करेगा…जय श्री राम च्या घोषणा देत राजस्थानी समाज मंचच्या वतीने रामदेवबाबा जयंती निमित्त जम्मा जागरण मध्ये नांदेड लोकसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या विजयासाठी विजयी संकल्प बैठक अत्यंत उत्साहात पार पाडली. यावेळी नांदेड दक्षिण चे उमेदवार आनंदराव बोंढारकर, नांदेड लोकसभेचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे, प्रदेश सदस्य अॅड. चैतन्य बापु देशमुख, अभिषेक सौदे, दिलीपसिंघ सोडी, शंकरमामा जाधव, राम लुटे, अशुतोष धर्माधिकारी बरबडेकर, बजरंगसिंह ठाकूर, बालाजी पा. शेळगांवकर, अकेश हंबर्डे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अखंड हिन्दुस्थानची अस्मिता आमचे दैवत प्रभु श्रीरामचंद्र यांचे मंदिर आयोध्येत उभारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जन्म घ्यावा लागला. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 70 वर्ष काँग्रेस ने राम मंदिराचा मुद्दा जाणीवपुर्वक भिजत ठेवला होता. विशिष्ठ लोकांचा लाड पुरवण्यासाठी काँग्रेसने 100 कोटी हिन्दु बांधवांच्या भावनांशी खेळ खेळला परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवघ्या कांही महिन्यातच आयोध्येत प्रभु श्रीरामचंद्राचे मंदिर उभारूण प्राणप्रतिष्ठापना केली. खर्या अर्थाने आधुनिक हिन्दु धर्मरक्षक म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करावा लागतो. मोदी यांना शह देण्यासाठी, अखंड हिन्दुस्थानला तडे देण्यासाठी काँग्रस पाकिस्थानची भाषा बोलत आहे.
कश्मीरमध्ये पुन्हा 370 लागु करण्याची भाषा करत आहे. याचा अर्थ काँग्रेसला त्या देशातील 100 कोटी हिन्दु बांधवांची, अखंड हिन्दुस्थानची चिंता नाही त्यामुळे हिन्दु धर्मावर कोणतेही संकट येवू नये असे वाटत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करावे लागतील यासाठी होत असलेल्या नांदेड लोकसभेच्या निवडणूकीत कमळ या निशानी वरील बटन दाबून डॉ. संतुकराव हंबर्डे यांना लोकसभेत खासदार म्हणून जाण्यासाठी आशिर्वाद द्या असे भावनीक आवाहन डॉ. हंबर्डे यांनी केले.
जम्मा जागरणात लोकसभेचे उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे आणि नांदेड दक्षिण शिवसेनेचे उमेदवार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांचा राजस्थानी समाज मंचच्या वतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान डॉ. हंबर्डे आणि बोंढारकर यांनी विश्व हिन्दु परिषद, बजरंग दल यांच्या कार्यसेवकांनी संयुक्तरित्या आयोजित बलीदान दिनाच्या रक्तदान शिबीरास भेट दिली. कारसेवकांशी संवाद साधला. याच वेळी भोई समाज बांधवांचीही बैठक पार पडली. भोई समाज बांधवांच्या समस्या सोडवीण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करू असा विश्वास डॉ. संतुकराव हंबर्डे यांनी दिला. तर आ. हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत जुना मोंढा येथे मंडप डेकोरेशन असोशिएशनची बैठक पार पडली.