Homeक्राईमtwara police seized 27 lakh 35 thousand 375 rupees : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर...

twara police seized 27 lakh 35 thousand 375 rupees : निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इतवारा पोलीसांनी जप्त केला 27 लक्ष 35 हजार 375 रुपयाचा मुद्देमाल जप्त -NNL

नांदेड| इतवारा पोलीसांकडुन आगामी लोकसभा पोटनिवडणूक व नऊ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर एकुण 17 लक्ष 35 हजार 375 रुपयाची नगदी रक्कम व वाहन किमंती 10 लक्ष असा एकुण 27,35,375/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक नांदेड अबिनाश कुमार यांनी सर्व पोस्टे. प्रभारी अधिकारी यांना निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सतत पेट्रोलिंग करुन वाहने चेक करुन अवैध पैशाची वाहतुक करणारे व्यक्तीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आगामी निवडणुकी संबधाने दिनांक 11/11/2024 रोजी पोलीस स्टेशन इतवारा गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड, परि. पोलीस उपनिरीक्षक विलास पवार, गुन्हे शोध पथक असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना 12.30 वाजताचे सुमारास बाफना टी पॉइंट, नांदेड या ठिकाणी SIS PROSEGUR असे नाव असलेली बंद बॉडीची MH 12- UM-4216 या क्रंमाकाची चारचाकी बंद बॉडी / कॅबीन असलेले वाहन आढळुन आले.

सदरचे चारचाकी वाहन थांबवुन तपासणी केली असता त्या वाहनामध्ये 17,35,375 /- रुपयाची रक्कम मिळुन आली. सदर रक्कम ही कशाची आहे याबाबत सदर वाहनामधील व्यक्तीनां विचारले असता त्यांनी समाधान कारक उत्तर दिले नाही. म्हणुन सदर रक्कम व वाहन पोलीस स्टेशन इतवारा येथे आणुन पंचासमक्ष जप्त करुन निवडणुक निर्णय अधिकारी यांचेकडे जमा केले आहे. वरील सर्व कारवाईमध्ये एफएसटी, आयटी, इत्यादी संबधीत एजन्सीनां सुचीत केले आहे. तसेच निवडणुक आयोगाच्या पीएस आणि इएसएमएस पोर्टल मध्ये सदर जप्तीच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. सदर रक्कमे बाबत संबधीत एजन्सीज या पुढील चौकशी करुन पुढील योग्य ती कारवाई त्यांच्याकडुन केली जाणार आहे.

सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा उपविभाग नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन इतवारा प्रभारी अधिकारी रणजीत भोईटे व त्यांच्या पथकाने केली आहे. वरिष्ठांने त्यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments