नांदेड| अवैद्यधंदे व जबरी चोरी मधील आरोपीचा शोध घेण्यासाठी रात्रगस्तीवर असलेल्या उस्मानगर पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले असून, अन्य चार आरोपी फरार झाले आहेत.
अबिनाशकुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लॅश आउट” अंतर्गत अवैद्यधंदे व जबरी चोरी मधील आरोपीचा शोध घेवून त्याचे विरूध्द कार्यवाही करणेबाबत सहा. पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार पो. स्टे उस्माननगर यांना आदेश दिले होते. त्यावरून दि.27/10/2024 रोजी मा.स.पो.नि चंद्रकांत पवार यांचे आदेशाने पोलीस उप निरीक्षक गजानन गाडेकर, पो.उप.नि सुनिल सुर्यवंशी पोलीस अंमलदार पोहेकॉ. रेजितवाड, पोहेकॉ. शिवपुजे पोहेकॉ. कुबडे चालक पोकॉ.बलवान कांबळे, पोकॉ. अनिरुध्द वाडे, पोकॉ. मगदुम शेख पो.स्टे उस्माननगर हे त्यांचे टिम मधील अंमलदार याना सोबत पो. स्टे हाद्दीत रात्री ७ वाजता पेट्रोलिंग करताना गुप्त माहिती मिळाली.
यावरून बामणी फाटा परिसरात कलंबर (खु) ते बारूळ जाणारे रोडलगत जंगलात पाच ते सहा इसम दरोडा टाकण्याच्या इराद्याने अंधारात दबा धरून बसलेले असुन ते अग्निशस्व व घातक शस्त्र बाळगून आहेत. या माहिती प्रमाणे सदर ठिकाणी 20.30 वा छापा टाकला असता पाच ते सहा इसम आम्हाला पाहून पळू लागले. तेव्हा त्यांचा पाठलाग करून दोघांना पकडले व चार जण अंधाराचा फायदा घेवून पळून गेले. पकडलेले दोघांना त्यांचे नाव गाव विचारले असता प्रदीपसिंग विजयसिंग खालसा वय 24 वर्षे रा. खुरसाळे हॉस्पीटल जवळ, यात्री निवास रोड, नांदेड, ओमकार शेषेराव मुदीराज वय 23 वर्षे रा. सकोजी नगर, नांदेड असे सांगितले.
त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात एक लोखंड़ी गावठी कट्टा (पिस्टल) व दोन जिवंत काडतूस व तीन लोखंडी तलवारी दोन मोबाईल एक मोटार सायकल असा एकूण 85,500/-रू मुद्देमाल मिळून आला सदरचा मुद्देमाल दोन पंचासमक्ष जप्त केला आहे. म्हणुन सदर आरोपी विरूध्द पोलीस ठाणे उस्माननगर ता. कंधार गुरनं 194/2024 कलम 310(4),310(5) भा. न्या. सं.सह कलम 4/25,3/25 भा ह का 1959 प्रमाणे दाखल करून सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप. निरीक्षक गजानन गाडेकर हे करीत आहेत. पो.स्टे. उस्माननगर येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याबद्दल अबिनाशकुमार पोलीस अधिक्षक नांदेड यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
हि कामगिरी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अप्पर पोलीस अधिक्षक भोकर, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड, श्रीमती अश्विनी जगताप, उप. विभागीय पोलीस अधिकारी उप. विभाग कंधार यांचे मार्गदर्शनाखाली चंद्रकांत पवार सहा. पोलीस निरीक्षक, गजानन गाडेकर पो उप.नि, सुनिल सुर्यवंशी, पोलीस अंमलदार पो.हे. कॉ/2119 रेजितवाड, पो. हे. कॉ/582 शिवपुजे पो.हे. कॉ, 851 कुबडे चालक पो. कॉ/2667 बलवान कांबळे, पो.कॉ/ 330 अनिरुध्द वाडे, पो.कॉ/ 2998 मगदुम शेख पोलीस ठाणे उस्माननगर यांनी करून एक लोखंडी गावठी कट्टा (पिस्टल) मँगजिन सह, दोन जिवंत काडतुस, तीन तलवार दोन मोबाईल, एक मोटार सायकल व दोरी असा एकूण 85,500/-रू मुद्देमाल जप्त केला आहे.