धार्मिकनांदेडव्हिडीओ

Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

हिमायतनगर, आकांक्षा मादसवार| शहरातील गोरगरीब, मजूरदार वर्ग वास्तव्य करणाऱ्या परिसरातील म्हणजेच लकडोबा चौकात असलेल्या हनुमान मंदिरात या भागातील वारकरी सांप्रदायिक महिला मंडळाच्या पुढाकारातून यावर्षीपासून काकडा आरतीच्या प्रथेला सुरुवात करण्यात आली आहे. सकाळच्या प्रहरी होणाऱ्या आरतीला शेकडोच्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होत असल्याने दिवाळीच्या पर्वामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

IMG 20241026 060540 Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

IMG 20241026 060536 Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

सकाळच्या रामप्रहरी म्हणजे चार वाजता अभ्यंगस्नान करून घरासमोर सडा – सारवन आणि रांगोळी काढून महिला मंडळी परिसरातील लकडोबा चौकात असलेल्या गदाधारी हनुमान मंदिर सभागृहात एकत्र होतात. या ठिकाणी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची पूजा करून पाच वाजता काकडा आरतीला सुरुवात केली जाते. विविध प्रकारचे धार्मिक गीते, आरती म्हणत शेवटी काकडा आरती केली जाते. त्यानंतर पसायदान घेत काकडा आरतीच्या समारोप केला जातो. तसेच महिला मंडळींकडून विठ्ठल रुख्माई तसेच अन्य धार्मिक गीतावर फुगडी खेळत जणू काही वारीचा गेल्याचा आनंद घेतात.

IMG 20241026 060523 Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

IMG 20241026 060518 Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात करण्यात आलेल्या काकड आरतीला मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, यंदापासून सुरू झालेल्या काकडा आरतीच्या उपक्रमात परिसरातील महिलांचा मोठ्या प्रतिसाद मिळत आहे. या काकडा करतील जास्तीत जास्त महिला मंडळींनी उपस्थित होऊन पुण्य पदरी पाडून घ्यावे असे आवाहन लकडोबा हनुमान मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

IMG 20241026 060503 Lakdoba Chowk Cucumber Aarti : हिमायतनगरच्या लकडोबा चौकात काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा मोठा प्रतिसाद -NNL

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!