HomeकरियरSantseva Lal Samrudhi Laman Tanda Yojana : संतसेवालाल समृध्दी लमाण तांडा योजनेच्या...

Santseva Lal Samrudhi Laman Tanda Yojana : संतसेवालाल समृध्दी लमाण तांडा योजनेच्या तालुका समितीवर विकास राठोड, महेश जाधव यांची निवड -NNL

हदगांव| संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेंतर्गत गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली. या समितीवर सदस्यपदी हदगाव तालुक्यातील मुळचे पांगरी तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार विकास राठोड़ व महेश जाधव या दोघाची हदगाव तालुका समितीवर यांची नियुक्ती करण्यात आली.

ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय क्र. तांडा सुधार-२०१९/प्र.क्र.६७/आस्था-५, दि.२३ फेब्रुवारी २०२४ अन्वये संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजना अंमलबजावणी करण्यासाठी हदगाव तालुका स्तरावर दोन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बंजारा लमाण तांडा वस्ती घोषित करणे, गावठाण जाहिर करणे, तांड्याला महसूली गाव घोषित करण्याची कार्यवाही करणे, ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही करणे इत्यादी व इतर अनुषंगिक कार्यवाहीसाठी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा लमाण लभाण समाजाचे अशासकीय सदस्यांची तीन वर्षाकरिता निवड करुन तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.

गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीवर सदस्य म्हणून हदगांव येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते विकास राठोड़ व महेश जाधव यांची निवड करण्यात आली. याबाबत पत्रकार संरक्षण समिती व शाम लाहोटी गजानन सुखापुरे सोनसळे आदींनी स्वागत केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments