World Hand Wash Day ; जागतिक हात धुवा दिवस; आज जिल्हयात विविध उपक्रम नागरिकांनी सहभाग घ्यावा- सीईओ मीनल करनवाल – NNL

minal karanwal 2 World Hand Wash Day ; जागतिक हात धुवा दिवस; आज जिल्हयात विविध उपक्रम नागरिकांनी सहभाग घ्यावा- सीईओ मीनल करनवाल - NNL

नांदेड | 14- 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्हयात आज विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे.

जागतिक स्वच्छता दिनाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा यासंदर्भात लोकशिक्षण घडून आणण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने आज ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा, महावि‌द्याल व अंगणवाडयामधून जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शालेय वि‌द्यार्थी व गावक-यांना हात धुण्याच्या पद्धती, हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येणार आहे.

हात धुवा दिन World Hand Wash Day ; जागतिक हात धुवा दिवस; आज जिल्हयात विविध उपक्रम नागरिकांनी सहभाग घ्यावा- सीईओ मीनल करनवाल - NNL

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांना समन्वय साधून काम करावे. यामध्ये ग्रामपंचायत विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिले आहेत. तसेच लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, युवक-युवती, महिला मंडळ, शालेय वि‌द्यार्थी तसेच गावक-यांनी जागतिक हात धुवा दिवसानिमित्त होणा-या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित राह्न हा दिवस साजरा करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top