नांदेडलाइफस्टाइल

Women’s empowerment program canceled for now : नांदेड येथील आजचा महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम तूर्तास रद्द -NNL

नांदेड| ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. त्यामुळे आज दिनांक 10 रोजी गुरुवारी होणाऱ्या महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने पुढे केला आहे. कार्यक्रमाबाबत नवीन तारीख, वेळ, स्थळ लवकरच जाहीर केली जाईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले आहे.

श्री.रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील,असे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे .या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे कुठलेही कार्यक्रम होणार नाहीत. त्यामुळे नांदेड येथील मोंढा मैदानावर आज दुपारी होणारा कार्यक्रम तूर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. कार्यक्रम नेमका कधी होईल हे मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन ठरविण्यात येईल व त्याबाबतचे अधिकृत घोषणा नंतर करण्यात येईल असेही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील समस्त जनतेने विशेषता महिला भगिनींनी याची नोंद घ्यावी. जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृत माहिती दिली जाईल.

आज 10 ऑक्टोबर रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहीर
जेष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे निधन बुधवार 9 ऑक्टोबर 2024 रोजी झाले आहे. त्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने संपूर्ण राज्यात 10 ऑक्टोबर 2024 रोजी एक दिवसाचा दुखवटा जाहिर केला आहे. दुखवटयाच्या दिवशी 10 ऑक्टोंबर 2024 रोजी ज्या इमारतीवर दररोज नियमित राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो त्या ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर चढविण्यात यावा. या दिवशी कोणतेही शासकीय मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी बिनतारी संदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना कळविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!