नांदेडराजकीय

Dr. Rekhatai Chavan met Chabharekar : काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी घेतली गंगाधरराव चाभरेकर यांची भेट -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| आगामी विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याला अवघ्या काही दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच हदगाव, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथीला मोठा वेग आला आहे. काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीकडून इच्छुक आणि उमेदवारी मिळण्याच्या आघाडीवर असलेल्या डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांची भेट घेऊन चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे खरोखरच डॉ.रेखाताईंना काँग्रेसची उमेदवारी मिळणार आहे का…?अशी चर्चाही आता रंगू लागली आहे. 

हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक महिन्यांपासून डाॅ. रेखाताई चव्हाण काम करीत आहेत. गावभेटीवर त्यांचा जास्त भर असून, विकासापासून कोसो दूर असेलल्या गावात.. ठिक ठिकाणी जावून तेथील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या त्या जाणून घेत आहेत. त्यांच्या या जनसंवाद फेरीला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यन्त त्यांनी विधानसभा मतदार संघातील २०० हुन अधिक गावांना भेट देऊन आपला जनसंवाद दौरा यशस्वी केला आहे. त्यांच्या या जनसंवाद दौऱ्याची आणि त्यांनी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविलेल्या विविध उपक्रमाची आणि गोर गरिबांसह शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी त्यांनी चालविलेल्या धाडपडीची जिकडे तिकडे जोरदार चर्चा होत असून, त्यांना उमेदवारी नक्कीच मिळेल असा ठाम विश्वास त्याचे समर्थकांनी व्यक्त केला आहे.

 सध्या नवरात्र महोत्सव चालू असून, स्त्री शक्तीचा जागर कार्यक्रमादरम्यान त्यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावास भेटी देऊन नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काल मंगळवारी सायंकाळी त्यांनी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपूर गावास भेट दिली. यावेळी तेथील महिलांनी त्यांना आरतीचा मान देऊन गौरव करीत एक चांगल्या प्रकारचा संदेश दिला आहे. या दोन तिन महिन्याच्या कालावधीत त्यांनी हदगाव हिमायतनगर मतदारसंघ अगदी पिंजून काढला आहे. नुकतीच डाॅ. रेखाताई चव्हाण यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील नेते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गंगाधर पाटील चाभरेकर यांची भेट घेऊन चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीकडून त्या प्रबळ दावेदार म्हणून सध्यातरी पुढे असून, माताराणीच्या कृपेने माझ्या नावाला नक्कीच बिफॉर्म लागेल आणि हदगाव हिम्यातनगर विधानसभा मतदार अनाघातील जनतेची सर्व करण्याची संधी मला पक्षाकडून मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button