Thus, the police : इतवारा पोलीसांनी गोवंशजातीचे 08 जनावरे पकडुन 9 लक्ष रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

नांदेड| ऑपरेशनला फ्लुश आऊट अंतर्गत इतवारा पोलीसांनी गोवंशजातीचे 08 जनावरे पकडुन 9 लक्ष रूपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीमुळे गोवंशाची तस्करीं करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी (Operation Flush Out) अंतर्गत अवैद्य जनावरांची वाहतुक करणारे इसमांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दि.05/10/2024 रोजी दि.07.00 वा. चे सुमारास पेट्रोलींग करीत असताना इतवारा पोलीसानां गुप्त बातमीदारांमार्फत माहीती मिळाली की, बाफना ते देगलुरनाका कडे येणारे रोडवर दोन पिकअप वाहन क्रं. MH-22-AN-0938 व MH-26-BE-4134 मध्ये गोंवश जातीचे जनावरे कोंबुन नेत आहेत अशी गोपनीय माहिती मिळाल्याने तात्काळ सपोनि महेश मुळीक, पोउपनि. रमेश गायकवाड, परि. पोउपनि. विलास पवार, पोहेकॉ/ शेख वाजीद, पोकों /कोरनुळे, होमगार्ड सय्यद इरफान, असे रवाना होवुन सकाळी 07.45 वाजताचे सुमारास सदर वाहनास बाफना रोड ते देगलुर नाका कडे जाणारे रोडवरील रजा चौक सार्वजनिक रोडवर नांदेड येथे थांबवुन त्याची पाहणी केली.

त्यात गोवंश जातीचे एकुण 08 बैल किंमत 3,00,000/-रुपयाचे व पिकअप वाहन किमंती 6,00,000/- रुपयाचा असा एकुण 9,00,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवंशजातीचे बैल आठ जनावरांना निर्दयतेने दाटीवाटीत कोंबुन त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहतुक करीत असताना मिळुन आले. सदर आरोपीचे नाव गाव विचारता त्यांनी आपली नावे 01) जबीउल्ला खान पिता जहिरुल्ला खान ०२) मोहम्मद इसाक मोहम्मद इब्राहिम 03) मिरासाब अब्दुल शेख 04)मोहम्मद एजाज मोहम्मद बाबुलाल सर्व रा. टायरबोर्ड देगलुरनाका, नांदेड असे सांगितले. त्यावरुन त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन इतवारा गुरन 365/2024 व 366/2024 प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम 1976 चे कलम 5, 5 (अ), 9 सह कलम 11 (1) (ड) (ई) प्रांण्याना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 व मोटार वाहन अधिनियम कलम 83/177 असा विविध कलमाअतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर, सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली श्री रणजीत भोईटे, पोलीस निरीक्षक इतवारा पोलीस स्टेशन, सपोनि. महेश मुळीक, पोउपनि, रमेश गायकवाड, परि. पोउपनि, विलास पवार, पोहेकों/ शेख वाजीद, पोकों / कोरनुळे, होमगार्ड सय्यद इरफान, यांच्या पथकाने चांगली कामगीरी केली असुन वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button