Thursday, May 14

Nanded police ; भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने काही तासाचे आत चोरीचा गुन्हा उघड करुन गन्हयात चोरीस गेलेला माल जप्त केला -NNL

भाग्यनगर पोलिसांची कामगीरी

नांदेड। ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार माली गुन्हयातील गुन्हेगाराना अटक करण्याबाबत मा. पोलिस अधिक्षक नांदेड यांनी पोलिस निरीक्षक भाग्यनगर यांना आदेशीत केले होते त्यानुसार श्री रामदास शेडंगे पोलिस निरीक्षक भाग्यनगर, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्हयातील आरोपीतांचा शोध घेणे चालु केले होते.

त्या अनुशंगाने पोलीस ठाणे भाग्यनगर येथे दि. 10/09/2024 रोजी 10.30 वाजन्याचे सुमारास गुन्हे शोध पथकाचे पो.उप.नि.केजगीर यांना माहीती मिळाली कि छत्रपती चौक येथे काही महीलानी लहान मुलाचे गळ्यातील सोन्याचे ओम हिसकावुन चोरुन नेले आहे अशी माहीती मिळाल्याने सदरची माहीती वरीष्ठाना देवुन पो.उप.नि. केजगीर व त्यांचे पथकातील अमंलदार हे लागलीच सदर भागात जावुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे शोध घेतला असता कॅनलरोडवर एम के पाटील शाळेजवळ दोन संशयीत महीला मिळाल्याने त्यांना महीला अमंलदार यांचे कडुन ताब्यात घेवून पो.स्टे.ला आणुन त्यांना विचारपुस केली.

त्यांनी त्यांचे नावे. शेख हिना उर्फ चंदा भ्र.शेख जमाल वय 30 वर्ष व्यवसाय मजुरी रा. गौतमनगर सांगवी बु नांदेड ह.मु. क्रांतीनगर पुर्णा ता. पुर्णा जि. परभणी व सोबत एक वि.स.वा असे सांगुन त्यांचे ताब्यातुन चोरीस गेलेला मुद्देमाल एक सोन्याचे पान किंमती 7000/-रु चे हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आनला आहे. तसेच नमुद आरोपी विरुध्द मिनाक्षी भ्र. गोविंद गोविंदवार यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. भाग्यनगर येथे गु.र.न. 447/24 कलम 304(2).3(5) BNS प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन तपास पो.हे.कॉ./1098 किडे हे करत आहेत.

सदरची कामगीरी अबिनाश कुमार पोलिस अधिक्षक नांदेड, सुरज गुरव अप्पर पोलिस अधिक्षक नांदेड, खंडेराव धरने अप्पर पोलिस अधिक्षक भोकर, यांचे मार्गदर्शनाखाली रामदास शेंडगे पोलिस निरीक्षक भाग्यनगर, गुन्हे शोध पथक पो.स्टे भाग्यनगर चे पो. उपनि के.वि. केजगीर पो.हे.कॉ 2150 विशाल माळवे, पो.हे.कॉ 1098 गजानन किडे, पो.कॉ. 516 हनवता कदम, म.पो.हे.कॉ. 2525 केळगंद्रे यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलिस अधिक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!