HomeनांदेडDarshan of Ganaraya : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन...

Darshan of Ganaraya : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन -NNL

मुंबई| केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले.

गृहमंत्री शाह यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना ‘शासन आपल्या दारी’ पुस्तकाची प्रत आणि गणपतीची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी गृहमंत्री शाह यांचे औक्षण करीत स्वागत केले.

यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी गृहमंत्री शाह यांनी मुख्यमंत्री शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली यांच्याशी संवाद साधला.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सागर निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सहकुटुंब शाह दाम्पत्याचे स्वागत

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले सागर निवासस्थानी श्री गणरायाचे दर्शन 1 Darshan of Ganaraya : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन -NNL
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी भेट देवून श्री गणरायाचे दर्शन घेतले.यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्री.शाह यांचे श्री गणेशमूर्ती, शाल, श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, कन्या दिविजा फडणवीस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, माजी खासदार रावसाहेब दानवे हे उपस्थित होते

 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments