Thursday, May 14

Ex. Chief Minister Ashok Chavan : विकासाच्या कामामध्ये कोणी आडवा आला तर त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही -माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण -NNL

भोकर, गंगाधर पडवळे| तालुक्यातील भोसी येथे माजी जी. प. सभापती प्रकाशराव देशमुख भोसीकर यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांन सोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जाणता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी अशोक चव्हाण म्हणाले की मी व माझे कुटुंबिय आणि भोकर तालुका यांचा अगदी जवळच नात असून माझ्या वडिलांना म्हणजेच स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांना देशाच्या गृहमंत्री पदापर्यंत आणि मला राज्याचा मुख्यमंत्री बनविण्याची किमया या भोकर मतदारसंघानी केली आहे त्या मुळे या मतदार संघातील जनतेचे आम्ही उपकार विसरू शकत नाही, तेंव्हा या मतदार संघांच्या विकास कामासाठी मी निधी कधीच कमी पडू देणार नाही तेंव्हा आपले गट तट बाजूला ठेवून मतांचे ध्रुवीकरण(विभाजन ) होऊ देऊ नका व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या समोर भारतीय जाणता पार्टीचा उमेदवार म्हणून श्रीजया अशोक चव्हाण येणार असून तिला प्रचंड मताधिक्यानी विजयी करा असे भावनात्मक आव्हान केले.

तर आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रवेशकर्ते माजी सभापती जी. प. प्रकाश देशमुख भोसीकर, माजी सभापती शिवाजी देवतुळे, माजी उपसभापती मारोती झंपलंवाड,माजी संचालक धोंडिबा भिसे, व भोसीकर यांच्या भोसी गटातील असंख्य समर्थकांनी आज दि. ४ सप्टेंबर रोजी भोसी येथील त्यांच्या फार्म हाऊस वर मा. अशोक चव्हाण यांच्या हस्ते भाजप प्रवेश केला.चव्हाण कुटुंबंयाच या भागावर पूर्वीपासून किती लक्ष आहे. हे सांगताना हा भाग सुजलाम सुफलाम करण्यामागे एकमेव स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांचा सिंहाचा वाटा असल्याचे मत व्यक्त केले तर भोसी जी. प.सर्कल मध्ये बहुसंख्य गाव हे आदिवासी आहेत 22पैकी 12गाव हे आदिवासी गाव आहेत. ते अतिशय मेहनती व कष्ठाळु असून येथिल शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याकरिता डोरली,बोरवाडी येथे तलावाची अत्यंत आवश्यकता असल्याने ते करून द्यावेत त्याचं बरोबर अनेक शाळा ह्या जुन्या झाल्याने त्याना नवीन इमारतीच्या बांधकामची मान्यता मिळवून द्यावी अशी मागणी यावेळी प्रवेशकर्ते प्रकाश देशमुख यांनी केली.

यावेळी असंख्य कार्यकर्त्यांनी देखील भाजपा मध्ये प्रवेश घेतला त्यावेळी मंचावर माजी आमदार अमिताताई चव्हाण,अमर राजूरकर,सभापती जगदीश पाटील भोसीकर,श्रीजया चव्हाण,मंगारांनी अंबुलगेकर माजी. जी. प. अध्यक्षा ,माजी. जी. प. सदस्य दिवाकर रेड्डी, भगवान दंडवे, रामचंद्र मुसळे, दिलीप देशमुख सोमठाणकर,भोसीच्या सरपंच सौ.ताराबाई देशमुख,किशोर पाटील लगळूदकर, गणेश कापसे,शेख युसूफ, डॉ. फेरोज इनामदार आदींची उपास्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!