श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। तालुक्यातील मौजे हिवळणी शिवारातील शेतात पोळ्याच्या दिवशी बैलांना चारण्या करीता,आंघोळ करून आणण्यासाठी गेलेले तरुण शेतकरी विलास दारासिंग राठोड वय २८ यांचे सह एका बैलास खांबावरून तुटून शेतातील पिकात पडलेल्या जिवंत विद्युत तारांचा करंट लागल्याने बैलांसह शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. २ रोजी सकाळी ९.३० वाजता घडली आहे

माहूर तालुक्यातील मौजे हिवळनी येथील अल्पभूधारक शेतकरी विलास दारासिंग राठोड यांनी त्याचे काका मंगल राठोड यांचे शेत मंत्याने केले होते तसेच स्वतःची एक एकर कोरडवाहू शेती आहे दोन दिवसापासून माहूर तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस सुरू असल्याने सर्व शेतात पाणी साचले आहे. पोळ्याच्या दिवशी त्यांनी बैलांना शेतात नेऊन आंघोळ,बैलांना चारने करीता शेतात गेला.


पोळा सणासाठी बैलांना तयार करावे या हेतूने शेतात सकाळीच गेला होता शेतात असलेल्या विद्युत खांबावरचे तार तुटून जमिनीवर पडलेले त्यांना उभ्या पिकामुळे दिसले नाही त्यामुळे त्यांच्यासोबत असलेला दोन बैल पैकी एक बैल आणि विलास यांचा विद्युतदारांना स्पर्श झाला त्यामुळे तेथेच तडफडून जागीच गत प्राण झाले


रस्त्याला लागून असलेल्या शेतातच मंगल राठोड यांचा वाटर प्लांट आहे त्यांना सदरील घटना दिसल्याने त्यांनी तात्काळ गावातील मंडळी सह नातेवाईकांना दूरध्वनीवरून ही घटना सांगितली घटना लगेच पोलिसांना कळविल्याने सिदखेड सपोनि रमेश जाधवर पोहेका गजानन कुंमरे यांचे सह पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करत मौजे आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश राठोड यांनी शव विच्छेदन केले पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांसह बैलाचा मृत्यू झाल्याने मौजे हिवळनी पापलवाडी आष्टा सह परिसरातील गावात शोककळा पसरली आहे.


