HomeनांदेडThe Sahastrakund scenic waterfall : तरुणाईला आकर्षित करणारा सहस्त्रकुंड निसर्गरम्य धबधबा ओसंडून...

The Sahastrakund scenic waterfall : तरुणाईला आकर्षित करणारा सहस्त्रकुंड निसर्गरम्य धबधबा ओसंडून वाहू लागला -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे| मराठवाड्यातील निसर्गाच्या सानिध्यात असलेले एकमेव पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाणारे सहस्रकुंड धबधब्याची ओळख असून नांदेड जिल्हातील किनवट तालुक्याच्या निसर्गाच्या कुशीत उदयास आलेलं इस्लापूर गावापासून अगदी चार किलोमिटर अंतरावर असलेला सहस्त्रकुंडचा धबधबा काल संध्याकाळ पासून सतत झालेल्या पावसामुळे ओसंडून वाहत असताना पाहाव्यास मिळत आहे. या निसर्गकारी, रोमांचकारी अनुभूतीमुळे तरुणाईचे आकर्षण वाढले आहे, अनेक पर्यटक सहस्त्रकुंडचा अद् भूत नजारा पाहण्यासाठी सहस्त्रकुंडकडे धाव घेवू लागले.

IMG 20240901 WA0064 The Sahastrakund scenic waterfall : तरुणाईला आकर्षित करणारा सहस्त्रकुंड निसर्गरम्य धबधबा ओसंडून वाहू लागला -NNL

नांदेड जिल्हयात काल संध्याकाळपासून सतत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे नदी – नाले ओसडून वाहत आहेत सहस्त्रकुंड धबधब्यातही मोठे पाणी आले असल्याने हा धबधबा अगदी खळवळून मोठया दिमाखाने ओसांडून वाहतो आहे. हे निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी विदर्भ आणि आंध्र प्रदेशातील पर्यटक येथे येत आहेत काही दिवसांपूर्वी विदेशी पयर्टक देखिल निसर्ग पर्यटन पाहण्यासाठी आले होते.

IMG 20240901 WA0067 The Sahastrakund scenic waterfall : तरुणाईला आकर्षित करणारा सहस्त्रकुंड निसर्गरम्य धबधबा ओसंडून वाहू लागला -NNL

नांदेड जिल्हयातील सहस्त्रकुंड धबधबा हा मराठवाडा आणि विदर्भाच्या सिमेवर नटलेला आहे, अलिकडच्या भागामध्ये उमरखेड तालुक्यापासून अगदी 17 किलोमिटर अंतरावर सहस्त्र कुंडचा नयनरम्य सोहळा पहावयास मिळेल तर किनवट तालूक्यातील इस्लापूर पासून ०4 कि.मी. अंतरावर हा धबधबा आहे.जवळपास 50 ते 60 फूट उंचावरून कोसळधार पडते आहे हे दृष्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येथे आहेत. या निसर्गरम्य परिसरात प्रशासनाच्या वतीने विविध सोई सुविधा तयार केलेल्या आहेत. सहस्त्रकुंडच्या काठावर सुंदर असा बगीचा आहे या ठिकाणी विविध प्रकारचे फुले आणि वृक्ष आहेत.

IMG 20240901 WA0066 The Sahastrakund scenic waterfall : तरुणाईला आकर्षित करणारा सहस्त्रकुंड निसर्गरम्य धबधबा ओसंडून वाहू लागला -NNL

शेजारील महादेवाचे मंदिर आहे. तिथे दरवर्षी हजारों भावीक अनुष्ठान करतात. श्रावण महिण्यात दररोज सकाळी महादेवाची आरती व पुजा करतात. सहस्त्रकुंड धबधब्या बाबत अनेक अख्यायायिका आहेत. भगवान परशुरामाने बाण मारला आहे. त्यामुळे हा कुंड तयार झाला आहे. अशी अख्यायायिका प्रसिध्द आहे.ते काही असो या निसर्गरम्य अद् भुत चमत्काराची जाणिव आणि विपूल आनंद या ठिकाणी प्रत्यक्ष गेल्यावरच पर्यटकांना पहावयास मिळेल

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments