Homeनांदेडपंढरपूर च्या संत नामदेव पायरीचा दरवाजा २६ लाखाच्या चांदीने मढविणार : बिलोली...

पंढरपूर च्या संत नामदेव पायरीचा दरवाजा २६ लाखाच्या चांदीने मढविणार : बिलोली च्या भाविकांचा पुढाकार -NNL

नांदेड। पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील संत नामदेव पायरीच्या दरवाजाला नांदेड येथील भाविक अरगुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

शंकर दिगंबर अरगुलवार व नरसिमलू दिगंबर अरगुलवार बांनी कै. दिगंबर तुकाराम अरगुलवार व कै. जनाबाई दिगंबर अरगुलवार या आपल्या आई-वडिलांच्या स्मरणार्थ हे काम करून देणार आहेत. सदरचे भाविक है श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्त असून नियमित दर्शनासाठी जात असतात ते बिलोली (जिल्हा नांदेड) येथील रहिवासी असून, या दरवाजासाठी सुमारे ३० किलो चांदीचा वापर करण्यात येणार असून, त्याची बाजार मूल्यानुसार सुमारे २६ लाख इतकी किंमत होत असल्याचे पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा चे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरा चे प्रवेशद्वारावरच संत नामदेव महाराज यांनी संजीवनी समाधी घेतली आहे. तेथे संत नामदेव पायरी असून विठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन घेण्याआधी नामदेव पायरी चे दर्शन घेऊनच वारकरी मंदिरात प्रवेश करतात. संत नामदेव पायरी ला वारकरी संप्रदायात माठे महत्व आहे. या पायरी चा २६ लाखाची चांदी लाऊन दरवाजा मढवला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील भाविक अरगुलवार परिवारातर्फे चांदी बसवून देणार आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments