HomeनांदेडJyotiba kharate ; ज्योतीबा खराटे यांची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता -NNL

Jyotiba kharate ; ज्योतीबा खराटे यांची न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता -NNL

श्रीक्षेञ माहुर, कार्तिक बेहेरे। शिवसेना पक्षाचे किनवट-माहुर विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या वर पंचायत समितीचे तात्कालीन गटविकास अधिकारी यु.डी.मांदाडे यांनी राजकीय दबावाला बळी पडून सन २०१७ मध्ये पोलिस स्टेशन माहुर येथे फिर्याद देऊन भा.द.वी कलम ३५३,२९४,५०६ अनव्ये गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यातून ज्योतीबा खराटे यांनी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

माहूर पंचायत समितीचे तात्कालीन गटविकास अधिकारी उद्धव मांदाडे यांनी शिवसेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा विधानसभा प्रमुख ज्योतीबा खराटे यांच्या विरोधात दि.१२ जुन २०१७ रोजी फिर्याद दाखल केली होती. त्या अनुषंगाने त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा असा गुन्हा दाखल केला होता. सदरील प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल धावरे यांनी केला होता.

तपासणी अंती त्यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते, या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय नांदेड येथे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ३ श्रीमती आर.आर.पटवारी मॅडम यांच्या दालनात ८ साक्षिदारांची जवाब तपासणी करण्यात आली होती. दि.२९ आॅगस्ट रोजी ज्योतीबा खराटे यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. खराटे यांची न्यायालयात ॲड.आ.जी.परळकर यांनी बाजु मांडली होती.

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवर राजकीय दबाव टाकून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले होते परंतु माझा न्यायदेवतेवर पुर्ण विश्वास होता व मला न्याय मिळाला. ज्योतीबा खराटे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments