Wednesday, May 13

Vyoshree and Tirthadarshan : सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘वयोश्री व तिर्थदर्शन’ योजनेची लाभ …भास्कर अण्णा तुम्मा -NNL

नांदेड| झोपडपट्टी भागात राज्य शासनाच्या लाभकारी योजना गरीब गरजू लोकांना व खरे लाभार्थना सरकारचे सर्व लाभकारी योजना पोहचावी या संकल्पनेतून भास्कर अण्णा तुम्मा यांनी नांदेड मध्ये आज दिनांक ३०/०८/२०२४ रोजी गंगाचाळ येथील मार्कंडेय मंदिर मध्ये सर्व समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मा.मुख्यमंत्री वयोश्री व तिर्थदर्शन योजनांच्या शिबीर घेण्यात आले.

या शिबीर मध्ये नांदेड समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मा.शिवानंदजी निमगरे, समाज कल्याण विभागाचे अधिकारी सुजाता पोहरे,दिगंबर पोतुलवार, विठ्ठल दुगळे, विजय पकाने, ज्योती जाधव या सर्व प्रमुख अधिकारी उपस्थितित राहून सर्व ज्येष्ठ नागरिकांना योजनेची सविस्तर माहिती सांगून मोफत फॉर्म भरून स्वीकारण्यात आले असता या शिबीर मध्ये भास्कर अण्णा मित्र मंडळाचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनी जमलेल्या लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या खूप मोठी गर्दी होती!

भास्कर अण्णा तुम्मा यांनी शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री व तीर्थ दर्शन योजनांबद्दल शासनाचे प्रथम धन्यवाद मानले व इच्छुक उपस्थितांना सर्वांनी सहभाग नोंदऊन या संधिचा फायदा घ्यावा असे आवाहान त्यांनी केले. ते म्हणाले की ज्येष्ठ नागरिक हे प्रत्येक योजने पासून वंचित राहतात विशेस करून झोपडपट्टी भागातील सर्व नागरिक याचे मुख्य कारण आहे कि, त्यांना घरातून बाहेर येणे खूप कठीण झाले कारण त्यांचे वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व ,अशक्तपणा असून त्यासाठी आज समाज कल्याण विभागचे अधिकारी माझ्या विनंती वरून ‘शासन आपलेदारी’ या विशेष उपक्रम राबिण्यासाठी तसेच आज रोजीचे या शिबीर मध्ये आमच्या झोपडपट्टी भागात आलेले समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त मा.शिवानंदजी निमगरे साहेबांचे व त्यांचे सर्व अधिकारी यांना विशेष आभार व्यक्त केले. या नंतर शिबीरा मध्ये आपले योगदान देण्यासाठी आलेले समाज कल्याणचे सर्व अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले आहे.

शासनाचे योजना झोपडपट्टी भागात घेऊन येण्यासाठी परिश्रम घेऊन शिबीर आयोजन केल्याबद्दल भास्कर अण्णा तुम्मा यांच्ये जिल्हा समाज कल्याण विगागाच्या तर्फे सत्कार करण्यात आले आहे. या नंतर नांदेड जिल्हा समाज कल्याण सहायक आयुक्त मा.शिवानंदजी निमगरे साहेबानी समाज कल्याण विगागाच्या वतिने सर्वतोपरी ज्येष्ठनागरिकांना सहकार्य करण्याचे अभिवचण दिले.अत्यंत खुमसदार शैलीत शासनाच्या सर्व योजनांबद्धल इतंभूत माहिती दिली.ज्येष्ठ नागरिकांबद्धल हे शासन फारच संवेदनशील असल्याचे सांगितले.या पुढेही ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ते शिबीरे तथा ज्येष्ठांचे मेळावे घेणार असल्याचे सांगितले.

वयोश्री व तीर्थ दर्शन योजनांबद्धल सविस्तर माहिती देऊन ज्येष्ठांना कुठेही व कसलीहि आडचण येऊ देणार नसल्याचे सांगितले . शिबीर साठीचा वेळही वाढऊन दिला व सर्वांनी या योजनेचा फायदा घेण्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रम मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या फॉर्म भरून व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गुर्रम श्रीनिवास मल्लेशम, अविनाश जिंदम, बुर्ला कनकराज, चिप्पा शुभम, उप्परपेल्ली सत्यानंद, चिप्पा हरीश, उप्परपेल्ली बालकिशन व भास्कर अण्णा मित्र मंडळाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!