Thursday, May 14

Subhash Suryavanshi retired : मुख्याध्यापक सुभाष सुर्यवंशी हे २९ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त -NNL

नवीन नांदेड| राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी हायस्कूल चे मुख्याध्यापक सुभाष सूर्यवंशी प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त कन्येका परमेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ हडको नांदेड संचलित राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष रामचंद्र सूर्यवंशी हे २९ वर्षे दोन महिने प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक ३१ ऑगस्ट २४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

त्यांचा जन्म कांडली खुर्द तालुका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जिद्दीने वस्तीगृहात राहून आपले बारावी पर्यंतचे शिक्षण जि प हायस्कूल हदगाव येथे पूर्ण केले बीएव्हि एनएन , कॉलेज नांदेड येथे इंग्लिश विषय घेऊन पूर्ण केले. बी एड शासकीय महाविद्यालय परभणी येथे पूर्ण केले डीएसएम सावित्रीबाई फुले अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे पूर्ण केले. एम.ए.इंग्लिश फर्स्ट पार्ट पीपल्स कॉलेज नांदेड येथे केले त्यानंतर त्यांची राष्ट्रमाता कस्तुरबा गांधी हायस्कूल हडको नांदेड येथे १ जुलै १९९५ ला इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे हेच त्यांचे ध्येय होते.

त्यासाठी त्यांनी सोप्या भाषेत इंग्रजी शिकवून विद्यार्थ्यात इंग्रजी विषयाची गोडी निर्माण केली. विद्यार्थ्यांची मन जिंकली शिकवणे ही एक कला आहे या युक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांना तासन्तास शिकून विद्यार्थी कंटाळत नसत म्हणूनच इंग्रजी सारख्या अवघड विषयाचा अनेक वेळा एस एस सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लावला. शाळेचा निकाल देखील ९७ ते १००% पर्यंत नेला,कोरोना काळात सुट्टीचा फायदा घेऊन इंग्रजी व्याकरणाचे अत्यंत सोपे पुस्तक लिहून विद्यार्थ्यांना अधिकचा फायदा करून दिला. व शाळेला नावलौकिक मिळवून दिले.

मुख्याध्यापक झाल्यानंतर त्यांनी शाळेत विविध उपक्रम सुरू केले एसएससी परीक्षेचा निकाल उंचावण्या साठी सर्व विषयाच्या जादा तासिका घेतल्या साप्ताहिक चाचणी सुरू केली ,संत तुकाराम वसतिगृह येथे अनेक विधार्थीना मोफत प्रवेश मिळुन दिला, सांस्कृतिक कार्यक्रम सह थोर पुरूषाच्या जयंती साजरी करून अनेक विधार्थीना भाषणे करून घेण्यासाठी प्रवृत्त केले. श्री शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सह पतसंस्थेच्ये सचिव म्हणून ऊतम कार्य केले, मराठा सेवा संघाचे सचिव म्हणून बारा वर्षे कार्य केले आहे. ३१ आगस्ट रोजी सेवानिवृत्ती निमित्ताने शाळेत सहपरिवार सपत्नीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!