बदलापूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे निषेध आंदोलन; गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या मागणी -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। बदलापूर व महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी बालिका व महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याबाबत व गृह मंत्रालय अशा घटनाना आळा घालण्यात व राज्यातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यात अपयशी ठरल्याने लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींविरुद्ध तात्काळ कठोर कारवाई करा व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीतर्फे काळ्याफिती लावून जिजामाता चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

बदलापूर व महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी बालिका व महिलांवर लैंगिक अत्याचार च्या घटना झाल्या असून सदर प्रकरणात गृह मंत्रालयाची भूमिका ही संशयास्पद दिसून येत आहे. ज्यामुळे राज्यात अराजक निर्माण झाले की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संशयास्पद भूमिका याबाबीस जबाबदार आहेंत. सदर प्रकाराने किनवट तालुक्यातील सुज्ञ व संवेदनशील जनता व्यथित झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेच्या वतीने बदलापूर, मुंबई, नाशिक, पुणे, अकोला, कोल्हापूर व महाराष्ट्र राज्यात व कोलकत्ता सह अनेक ठिकाणी बालिका व महिलांवर अत्याचार व खून झाले व दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या वाढत चाललेल्या घटनांचा काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बर राठोड शिवसेना उपटा गटचे तालुकाप्रमुख मारुती दिवसे पाटील, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष के.सूर्यकांत रेड्डी, शहराध्यक्ष काँग्रेस गिरीश नेमानीवार, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार जैहरोद्दीन खान, शहर प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रशांत कोरडे, तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस तथा संचालक बालाजी बामणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गडचे ज्येष्ठ नेते प्रवीण म्याकलवार, वसंत राठोड, अतुल दर्शनवाड, अमरदीप कदम,जयपाल जाधव,

संचालक प्रेमसिंग जाधव, राजू पाटील सुरोशे शेख ताहेरभाई, नागनाथ भालेराव, लक्ष्मीपती दोनपेल्लेवार, शेख समीर, संतोष येलचलवार,शेख मोईस, महेश चव्हाण तंबाखूवाला, माधव खेडकर, संतोष मिरासे संजय गरड पाटील मनोहर श्रीराम, शेख इलियास, फारुख चव्हाण, बजरंग बडगुरे, शेख समीर, शरद कोत्तापल्लीवार, अशोक साबळे, मारोती जीपकापे, शेख परवीन बेगम, सागर खंदारे, बालाजी शिरसाठ, प्रमोद जाधव, प्रमोद केंद्रे मधुकर मेश्राम, जयवंत चव्हाण, गुलाब जाधव,केशव कराळे, शेख अब्दुल, ग्राम पंचायत सदस्य प्रकाश गोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते या निषेध आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला होता.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button