नांदेडसोशल वर्क

Protest march at Collectorate : आदिवासी समाजाचा 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा -NNL

नांदेड| सकल आदिवासी समाजाच्या वतीने विविध मागण्यांसाठी दि. 23 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संविधानिक संस्थेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, विधानसभेचे उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ, आ. किरण लहामठे, अ.भा. आदिवासी युवा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लक्कीभाऊ जाधव यांच्या प्रतिमेची अवहेलना करणार्‍या बोगस आदिवासींविरूद्ध अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा, डॉ. राजेंद्र भारूड यांच्या विरूद्ध जळगाव येथे दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा मागे घ्यावा, जातवैधता प्रमाणपत्र समिती किनवटचे कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून तात्काळ किनवट जि. नांदेड येथे स्थलांतरित करावे, सर्वोच्च न्यायालयाने 2017 रोजी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून राज्यात अधिसंख्य ठरलेल्या 12 हजार 500 पदांची विशेष भरती तात्काळ सुरू करावी,

राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अनुसूचित जमातीतील जातवैधता प्रमाणपत्र अद्यापही सादर न केलेल्या कर्मचार्‍यांना तात्काळ बडतर्फ करून त्यांच्या जागी खर्‍या आदिवासींची विशेष भरती प्रक्रिया राबविण्यात यावी, आ. किरण लहामठे व लकीभाऊ जाधव यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे व अन्य मागण्यांसाठी भव्य आक्रोश मोर्चा 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानापासून प्रारंभ होणार आहे. महात्मा फुले पुतळा, शिवाजीनगर, वजिराबाद चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

या मोर्चात माजी मंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभेचे उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ, माजी मंत्री वसंत पुरके, आ. भीमराव केराम, माजी आ. डॉ. संतोष टापरे, माजी आ. उत्तमराव इंगळे, लक्कीभाऊ जाधव, जि.प.च्या माजी अध्यक्षा जनाबाई डुडूळे, गणाजी बेले, आरतीताई फुपाटे, सतीश पाचपुते, सत्यवृत ढोले यांच्यासह आदिवासी समाजाचे अनेक नेते व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

नांदेड जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांनी आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सुभाष वानोळे, संतोष तायवाडे, माधव मडावी, सईताई गंगाधर खुडे, संजर मांरमकर, दिलीप खुपसे, अशोक घंटेवाड, रामभाऊ खरोडे, नागोराव मेंडके, सूर्यकांत मिरासे, जयंत वाळके, संतोष धुमाळे, अ‍ॅड. गणेश थोरकड, अक्षय डवरे, मंचन वाळके, गजानन कनाके, अ‍ॅड. सुरेश गामोड यांच्यासह संयोजन समितीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!