Himayatnagar is strictly closed : बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद -NNL

हिमायतनगरअनिल मादसवार। बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूवर तेथील धर्मांध लोकांकडून होत असलेल्या अत्याचार विरोधात दि.17 शनिवारी हिमायतनगर शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला. यावेळी शहरातील मुख्य रस्त्याने हाथी निषेधाचे फलक घेऊन युवकांची रैली काढण्यात आली. हा बंद यशस्वी करण्यासाठी सकल हिंदूवादी युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

मागील काही दिवसापूर्वी बांगलादेशाचे सरकार पायउतार झाल्यानंतर बांगलादेशात असलेल्या अल्पसंख्यांक हिंदूवर तेथील धर्मांध लोकांनी अनन्वित अत्याचार सुरु केले आहे. त्यामुळे येथील हिंदूंचे जीवन नरकमय झाले असून, हिंदू महिला माता भगिनींवर अतोनात अत्याचार होत आहेत. या घटनेच्या विरोधात तमाम महाराष्ट्रातील हिंदू बांधव आपसातील जाती – धर्म भेद सोडून एकवटला आहे. तिथे होत असलेल्या अत्याचाराच्या निषधार्थ दिनांक 17 ऑगस्ट रोज शनिवारी हिमायतनगर शहर व तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील श्री परमेश्वर मंदिराजवळ युवकांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध नोंदविला.

त्यानंतर शहरातील मुख्य रत्स्याने भव्य रैली काढली. यात अनेक युवकांनी हाथी निषेधाचे फलक घेऊन हर हिंदू कि यही पुकार… बंद करो ये अत्याचार… यासह विविध प्रकारचे घोषणा देत हिंदू समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला. रैली परत आल्यानंतर राष्ट्रगीताने समारोप करून याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक अमल भगत याना देण्यात आले. हिमायतनगर शहरासह तालुका बंदचे आवाहन सकल हिंदू समाजातर्फे करण्यात आल्याने शनिवार बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने, दुकाने, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, हॉटेल, भाजी फळ मार्केट, ॲटो युनियन सर्वांनी आपले व्यवहार दिवसभर कडकडीत बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला होता. त्याबाबदल सर्वांचे आभार मानण्यात आले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button