किनवट, परमेश्वर पेशवे| जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अर्धवट इमारत बांधकामामुळे आदिवासी बहुल भागातील गरोदर माता, स्तंनदा माता आणि बाळंतीण मातेसह लहान बालकांना उघड्यावरच उपचार घ्यावे लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने या भागातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून अर्धवट इमारत बांधकाम पूर्ण करून या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
किनवट आदिवासीबहुल भागातील जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नव्याने इमारत बांधकामास आदिवासी ट्रायबल विभागाकडून दोन कोटी वीस लाख रुपयाची मंजुरी मिळाली. आणि नव्याने इमारत बांधकामास सुरुवाती झाली या इमारतीचे पिल्लर बांधून वर स्लॅब (छत)ही टाकण्यात आले या कामाला जवळपास 20 महिने पूर्ण होऊन गेले मात्र कुठे माशी शिंकली देव जाणे आत्तापर्यंत हे काम पूर्ण झाले नाही. हे काम अर्धवटच असल्याने या भागातील आदिवासी गरोदर माता, स्तनदा माता, बाळातन महिला व अवघ्या पाच सहा महिन्याच्या बालकांना उघड्यावरच उपचार घ्यावे लागत आहेत.
जलधरा भागातील दऱ्या खोऱ्यात वाडी तांड्यावर राहणाऱ्या अनेक गावातील आदिवासी महिलांसह इतर नागरिकांना प्रथम उपचार घेण्यासाठी जलधरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे एक महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र जिल्हा परिषद प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे या भागातील आदिवासी महिला व नागरिकांना उघड्यावरच उपचार घ्यावे लागतात ही बाब खेदजनक आहे. आदिवासी गरोदर मातांना बाळंतपणासाठी साठी आर्थिक भुर्दंड सोसून हिमायतनगर किंवा किनवट अशा ठिकाणी डिलेव्हरीसाठी जावे लागत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जलधरा शासकीय आश्रम शाळेतील मुला मुलींना प्रथम उपचारासाठी येथेच यावे लागते.
ही बाब लक्षात घेऊन आदिवासी ट्रायबल विभागाकडून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत बांधकामासाठी दोन कोटी वीस लाख रुपयांची मंजुरी मिळाल्याने नवीन इमारत बांधकामास सुरुवाती झाली आतापर्यंत एक कोटी 25 लाख रुपये पर्यंत काम झाले आहे मात्र फक्त 40 लाख रुपये मिळाले आहेत इतर बांधकाम करण्यासाठी आरोग्य विभागाने आदिवासी विभागाकडे मागणी करून उर्वरित रक्कम मिळवून घेयायला होती मात्र आरोग्य विभाग, याकडे साफ दुर्लक्ष करत असल्याने या भागातील आदिवासी महिलेंसह नागरिकांना उघड्यावरच उपचार घ्यावे लागत आहेत व आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
आरोग्य विभागाने आदिवासी भागाकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून घ्यावा आणि अर्धवट इमारत बांधकामास सुरुवात करून ईमारत पूर्ण करावी आणि या भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवाव्यात अन्यथा आरोग्य विभागाच्या विरोधात रस्त्यावर उतरून नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
नव्याने इमारत बांधकाम गुत्तेदारास याबाबतीत विचारणा केली असता गुत्तेदारानी या इमारती बांधकामास दोन कोटी वीस लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे आतापर्यंत सव्वा कोटी लाख रुपयाचे काम झाले आहे मात्र फक्त 40 लाख रुपये मिळाले आहेत उर्वरित रक्कम मिळत नसल्याने हे काम अर्धवट राहिले आहे अशी माहिती गुत्तेदारांनी दिली आहे.