नांदेडक्राईम

Police raided Hatbhatti liquor store in Vaivadi, Dabdari : हिमायतनगर तालुक्यातील दाबदरी, वायवाडी येथे हातभट्टी दारू अड्डय़ावर पोलीसांची धाड – NNL

हिमायतनगर| तालुक्यातील दाबदरी व वायवाडी गाव येथे हात भट्टी, गावठी दारू अड्डय़ावर धाड टाकून पोलीसांनी हातभट्टी, गावठी दारू जप्त केली आहे. हि कारवाई दि. ४ रविवारी सकाळी साडे अकरा ते दुपारी एक वाजताच्या दरम्यान करण्यात आली आहे. नुकतीच नांदेड येथे नव्याने रुजू झालेले पोलीस उपमहासंचालक शहाजी उमाप यांनी बैठक घेऊन जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना अविद्या धंदे बंद करा अश्या सूचना दिल्यानंतर हिमायतनगर पोलीस एक्शन मोडवर आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दाबदरी येथे यातील नमूद आरोपीने विना परवाना बेकायदेशीर रित्या हातभट्टी, गावठी दारू किंमत ७ हजार रूपये अश्या स्वरूपाचा माल विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला माल मिळून आला. व तसेच वायवाडी येथे ही अश्याच स्वरूपाचा १४ हजार पाचशे रूपयांचा हात भट्टी, गावठी दारू किंमतीचा माल मिळून आल्याने दोन्ही ठिकाणच्या आरोपी विरुद्ध पोहेकाॅ. बालाजी दादाराव पाटील यांच्या फिर्यादीवरून गुरन. २०१/२०२४ ‌कलम ६५ ( ई ), मप्रोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोहेकाॅ श्री पाटील हे करीत आहेत. दरम्यान पोलीसांनी अवैध धंद्या विरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने अवैध धंदे वाल्याचे धाबे दणाणले आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button