हिमायतनगर,अनिल मादसवार| हादगावच्या सत्ताधारी आमदाराच्या विरोधामुळे हदगाव – हिमायतनगर शहरासाठीच्या ड्रेनेज लाइनसाठी ३०० कोटींचा मंजुरीच्या प्रस्तावाचा निधी थांबला असल्याचा घणाघाती आरोप महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केली. तसेच २० तारखेला मतदान करताना विचार करून मते द्या.. मी जनतेसाठी गेल्या २० वर्षांपासून पद नसताना काम करत आहे. हि माझी शेवटची निवडणूक असून, यानंतर मी निवडणूक लढविणार नाही. त्यामुळे मत वाया गेले समजून एकवेळ मला साथ द्या संधीचे सोने केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं आवाहन त्यांनी जनतेला केलं.
हदगाव हिमायतनगर तालुक्यातील विधानसभा निवडणुकीसाठी दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या यांच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. हिमायतनगर तालुक्यात मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या सभा झाल्या आहेत. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात व शहरात संगीत संच आणि हजारो कार्यकर्त्यांनी प्रचार रैली काढून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. यास मतदारांचा देखील उदंड प्रतिसाद मिळत असून, यामुळे बाबुराव कदम कोहळीकर यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.
आत्तापर्यंत तीन वेळा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर बाबुराव कदम यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. असे असले तरी निवडणुकीच्या रिंगणात विरोधकांचा घाम काढून बाबुराव कदम नेहमीच दोन नंबरवर राहिले आहेत. पराभवानंतर खचून न जाता त्यांनी पुन्हा जनसेवेचे कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. आता चौथ्यांदा बाबुराव कदम कोहळीकर हदगाव – हिमायतनगर विधानसभा निवडणूक लढवीत आहेत. हि निवडणूक अंतिम आणि प्रतिष्टेची केली असून, मागील २० वर्षांपासून मतदार संघात सर्वसामान्य जणतेसह शेतकरी वर्गासाठी केलेल्या कामाची परतफेड मतदानातून करू अशी खूणगाठ मतदारांनी बांधली असून, मतदार राजा बाबुराव कदम यांना पहिली पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. एकूणच या निवडणुकीत बाबुराव कदम मोठ्या लिडने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत आता मुस्लिम समाजातील कार्यकर्ते देखील बाबुराव कदम कोहळीकर यांना पाठींबा देत अनेक युवा कार्यकर्ते थेट शिंदे सेनेत दाखल होत असल्याचे दिसून येत आहे.