समस्याग्रस्त व पीडित महिलांसाठी 19 डिसेंबर रोजी महिला लोकशाही दिन -NNL

    0

    नांदेड। समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी सोमवार 19 डिसेंबर 2022 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

    दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 19 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली महसूल प्रबोधनी प्रशिक्षण भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमूद संबंधित विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

    Previous articleपेनगंगा रेल्वे स्थानक बंद करण्यात आले-NNL
    Next articleअनुज्ञप्तीच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन -NNL
    nnlmarathi.com
    Is Most Popular Marathi News Website from Nanded (India). We not only break news या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि लेखक, वार्ताहर, पत्रकार, संबंधित जाहिरातदारांची आहे. यास NNLMARATHIन्यूजचे प्रकाशक, संचालक/संपादक, मालक यांची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती, मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. यावरून काही वाद-विवाद निर्माण झाल्यास ते हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविले जातील.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here