नांदेड| मास्टर्स गेम्स, औरंगाबादच्या वतीने 3. री राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा 17 व 18 डिसेंबर रोजी पार पडली. या स्पर्धेत जि. प. प्रा. शाळा बेटसांगवी-1 येथील शिक्षक श्री. चंद्रकांत लामदाडे यांनी ब्रेस्ट 50 मीटर, ब्रेस्ट 100 मीटर व बटरफ्लाय 50 मीटर या तीनही प्रकारात गोल्ड मेडल मिळवून घवघवीत यश संपादन ‘केले. राज्यस्तरीय होणाऱ्या अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक वेळी ते गोल्ड मेडल मिळवतात. त्यामुळे जलतरणातील ‘ ‘गोल्ड मॅन म्हणून सर्व स्तरांतून कौतूक होत आहे. स्वतः मधील कलागुण आपल्या मुलींमध्येही उतरवत आहेत.
जलतरणात त्यांची मुलगी गार्गी चंद्रकांत लामदाडे ही तसूभरही कमी नाही. तिनेही सगरोळी येथे 17 डिसेंबर रोजी पार पडलेल्या शालेय विभागीय 14 वर्षाखालील जलतरण स्पर्धेत 50 मीटर फ्रीस्टाईल, 100 मीटर फ्रीस्टाईल या प्रकारात *गोल्ड मेडल* व 50 मीटर ब्रेस्टमध्ये सिल्हर मेडल मिळविल्यामुळे सदस्तीय राज्यस्तरीय स्पर्धा, बालेवाडी (पुणे) येथे तिची निवड झाली आहे.
दोघांनीही मिळविलेले हे यश इतर वडील व मुलींसाठी निश्चितच प्रेरणा देणारे आहे. मुलींना खेळाकडे प्रवृत्त न करणाऱ्या पालकांसाठीही आदर्श व आशादायी आहे, असे मत लोहा तालुका गटशिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, विस्तार अधिकारी आंबलवाड मॅडम, केंद्रप्रमुख नागोराव जाधव यांनी व्यक्त केले. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल मु. अ. श्री नरवाडे, राणे व शिक्षक श्री कोडगिरे, उद्धव मुळे, भुरे , बिजलगावे, केंद्रे मॅडम, मालू जाधव तसेच लामदाडे व काचमांडे या परिवारानेही अभिनंदन व कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.