Members of the Vidhan Sabha : राखीव निधी खर्च न करताच विधानसभा सदस्यांनी आपला कार्यकाळ संपविला -NNL
नांदेड| नांदेड जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबरला होत आहेत,तर नऊपैकी सहा विधानसभा क्षेत्रांनी बनलेल्या १६ नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक सुद्धा एकाच दिवशी २० नोव्हेंबर रोजी होत आहे. या दोन्ही निवडणूकांमध्ये गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांपेक्षा अधिक संख्येने मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दोन्ही निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले असून जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात एकुण २७ लाख ७१ हजार मतदार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. त्यात जवळपास ४० हजार दिव्यांग मतदार असुन दिव्यांगांनी आपले भविष्य ठरविण्यासाठी आजवर मोठ्या संख्येने मतदान केलेले आहे.
परंतु लोकसभा सदस्य आणि विधानसभा सदस्यांनी दिव्यांग मतदारांकडे अक्षरशः आजवर दुर्लक्षच केले असल्याचे पहावयास मिळाले आहे. एम्पीलैड्समधील दिव्यांगांचा दरवर्षीचा कमीत कमी ३० लाख ...
