grand Shankarpat Bull Jodi procession : महाशिवरात्रीनिमित्त श्रीक्षेत्र वाढोणा (हिमायतनगर) येथे पाच लाखांचे बक्षीसे असलेली भव्य शंकरपट बैलजोडी शर्यत
हिमायतनगर, अनिल मादसवार| श्रीक्षेत्र वाढोणा (ता. हिमायतनगर) येथील श्री परमेश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त शेतकरी बांधवांसाठी भव्य शंकरपट बैलजोडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या बैलजोडीसाठी तब्बल पाच लाख रुपयांच्या बक्षिसांची जंगी लूट ठेवण्यात आली आहे.
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर येथील रेल्वे गेट व तहसील कार्यालयाच्या बाजूला असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या मैदानात शंकरपट स्पर्धा होणार असून, त्या मैदानाच्या साफसफाई व सपाटीकरणाच्या कामाला शनिवारच्या मुहूर्तावर सुरुवात करण्यात आली आहे.
यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, शंकरपट स्पर्धेचे अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सेक्रेटरी श्यामसुंदर पाटील, सहसेक्रेटरी गजानन हडपकर, श्री परमेश्वर मंदिराचे संचालक अनिल मादसवार, विलास वानखेडे, नारायण माने, वामनराव प...
