Kabaddi tournament : पार्श्वनाथ यात्रेतील कबड्डी स्पर्धेत उंबरहिरा तांडा संघाचे वर्चस्व; प्रथम क्रमांक पटकावला
हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील पाच शिव महादेव फाटा येथे पार्श्वनाथ महादेव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य कबड्डी स्पर्धा गुरुवार, दि. ८ जानेवारी रोजी उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत उंबरहिरा तांडा येथील संघाने दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावून स्पर्धेवर आपले वर्चस्व सिद्ध केले.
अंतिम सामन्यात उंबरहिरा तांडा संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजेतेपद मिळवले. खेळाडूंच्या चपळ चढाया, अचूक बचाव व संघभावनेमुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या स्पर्धेत वडगाव (ज.) येथील संघाने द्वितीय क्रमांक पटकावला, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस —— संघाला मिळाले.
स्पर्धेतील प्रथम बक्षीस १५,००१ रुपये उंबरहिरा तांडा संघाला माजी सरपंच सुभाषराव सिल्लेवाड यांच्या वतीने देण्यात आले. द्वितीय बक्षीस ७,००१ रुपये सरपंच शंकरराव वागतकर व माजी सरपंच रामदा...
