Mahila Sashkthikaran Abhiyan : नवा मोंढा मैदानावर आता 13 ऑक्टोबरला महिला सशक्तिकरण अभियान मेळावा – NNL
नांदेड| महिला सक्षमीकरणाचा नांदेड जिल्हयाचा महिला आनंद मेळावा आता रविवार 13 ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज यासंदर्भात आढावा बैठक घेऊन सर्व जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क केले. यापूर्वी ठरल्याप्रमाणे कार्यक्रम होणार असून मोठ्या संख्येने महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबरला निधन झाले त्यामुळे राज्य शासनाने 10 ऑक्टोबरला एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला होता. त्यामुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. आता 13 ऑक्टोबरला रविवारी दुपारी 11 ते सायंकाळी 5 या दरम्यान हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 2 नंतर मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित महिला भगिनींशी, नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये जिल्ह्यातील हजारो महिला सहभागी होणार असून प्रशासन या दृष्टीने तय...
