Vasantnagar area : वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? -NNL
नांदेड| शहरातील वसंतनगर भागातील रखडलेली कामे केव्हा पूर्ण होणार ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला आहे. या भागात खासदार, माजी खासदार, आमदार आदी लोकप्रतिनिधींसह प्रतिष्ठितांचे वास्तव्य असतांना देखील ड्रेनेज लाईन कनेक्शन आणि रस्त्याचे कामांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरीकांमधून ओरड होत आहे.
शहरातील वसंतनगर भाग सखल भाग म्हणून ओळखला जातो पावसाळ्यात थोडा जरी पाऊस पडला तरी या भागात पाणीच पाणी होते गतवर्षी बहुतांशाच्या घरात पाणीच पाणी शिरले होते मात्र यावर्षी ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रशासनाच्या वतीने याभागात पाणी जमा होणार नाही यासाठी नालीकामास सुरुवात झाली त्यानंतर ड्रेनेज लाईनचे काम सुरु झाले पावसाळ्याच्या अगोदर ही कामे पूर्णत्वास होणे अपेक्षित असतांना देखील हे काम रखडवण्यातच गुत्तेदारांनी धन्यता मानली अशी परिस्थिती आहे. एक-दोन दिवस काम करायचे आणि नंतर ओरड झाल्यानंतर पुन्हा कामास स...
