Friday, June 26

Tag: were organized during

Mahaprasad : सतत 29 व्या वर्षी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत संगीत रजनी व महाप्रसादाचे आयोजन

Mahaprasad : सतत 29 व्या वर्षी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत संगीत रजनी व महाप्रसादाचे आयोजन

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| सतत 29 व्या वर्षी दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीनिमित्त भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्या वतीने भव्य संगीत रजनी व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आ. श्रीजया अशोकराव चव्हाण, भाजप महानगराध्यक्ष अमर राजूरकर, माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीने चारचाँद लागले. शुक्रवारी श्रीराम सेतु गोवर्धन घाट पुलाजवळ, डॉ. संतोष यादव यांच्या क्लिनिकसमोर उभारण्यात आलेल्या भव्य व्यासपीठावर दुपारी चार वाजता महाप्रसाद कार्यक्रमाची सुरुवात भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य अरविंद भारतीय, मुन्नासिंह तेहरा, व धर्मभूषण अॅड. दिलीप ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आली. भक्तांसाठी स्वादिष्ट मसाला चण्याचा महाप्रसाद रात्री साडेअकरा वाजेपर्यंत वाटप करण्यात आला. यादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी विविध दुर्गादेवी मंडळांच्या अध्यक्षांचा सन्मान करून त्यांचे अभिनंदन केले.सुरेश ...
error: Content is protected !!