Friday, June 26

Tag: was organized in Virasani under

Women’s Health camp : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वीरसनीत भव्य महिलांचे आरोग्य शिबिर

Women’s Health camp : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत वीरसनीत भव्य महिलांचे आरोग्य शिबिर

नांदेड, आरोग्य, लाइफस्टाइल
हिमायतनगर (अनिल मादसवार) मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत मौजे वीरसनी, ता. हिमायतनगर येथे दहा टक्के महिला व बालकल्याण निधीतून भव्य महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर ग्रामपंचायत वीरसनी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सरसम यांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीरीत्या पार पडले. या शिबिरात गावातील किशोरवयीन मुली, 19 ते 49 वयोगटातील महिला, ज्येष्ठ नागरिक, बालके व पुरुष यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. विशेषतः महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करून आवश्यक औषधोपचार ग्रामपंचायत वीरसनीकडून मोफत पुरविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. श्री. नकाते यांनी यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले की, “तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींनी वीरसनी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिराचा आदर्श घ्यावा. गावातील आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी सातत्याने अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.” याचब...
error: Content is protected !!