Friday, June 26

Tag: was marked by silver mace wrestling

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

Silver Mace Wrestling : महाशिवरात्री यात्रेचा शानदार समारोप! चांदीच्या गदेच्या कुस्तीने रंगवली होती श्री परमेश्वर यात्रा

नांदेड, स्पोर्ट्स
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | येथील श्री परमेश्वर यात्रेतील बहुप्रतिक्षित कुस्ती स्पर्धेने महाशिवरात्री यात्रेचा दिमाखदार समारोप झाला. यात्रेतील कुस्तीच्या मैदानात विशेषतः दुसऱ्या क्रमांकाची चांदीची गदा बक्षीस असलेली कुस्ती सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्र सह परराज्यातून अनेक नामांकित पैलवान दाखल झाले होते. दिवंगत पत्रकार परमेश्वर मारोती शिंदे यांच्या स्मरणार्थ दैनिक एकमतचे तालुका प्रतिनिधी नागेश शिंदे यांनी या कुस्तीसाठी ११ हजार रुपये रोख व एक किलो चांदीची गदा असे आकर्षक बक्षीस जाहीर केले होते. या प्रतिष्ठेच्या लढतीत हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील पैलवान निलेश शनेवाड यांनी दमदार डावपेच आणि थरारक झुंज देत प्रतिस्पर्ध्याला चित्त करून मैदान दणाणून सोडले आणि विजयाचे मानकरी ठरले. हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील पैलवानाने सलग दुसऱ्या वर्षी मिळविले...
error: Content is protected !!