Saturday, May 30

Tag: was formed through social media

Marriage of Durga : सोशल मीडियातून उभी राहिली माणुसकीची साखळी; दुर्गाचा विवाह आनंदात संपन्न

Marriage of Durga : सोशल मीडियातून उभी राहिली माणुसकीची साखळी; दुर्गाचा विवाह आनंदात संपन्न

नांदेड, सोशल वर्क
हदगाव, गौतम वाठोरे| तालुक्यातील बरडशेवाळा येथील दुर्गा बालाजी गाढवे हिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण समाजाच्या सामूहिक पुढाकारामुळे अविस्मरणीय ठरला. वडिलांचे छत्र पंधरा वर्षांपूर्वी हरपल्यानंतर आई वनाबाई यांनी रोजमजुरी करत दुर्गा व लहान भाऊ सुनील यांचे संगोपन केले. मात्र विवाह तोंडावर असताना वाढती महागाई आणि खर्चाचा डोंगर पाहता कुटुंब अडचणीत सापडले होते. ही बाब समाजोपयोगी कार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आधार प्रतिष्ठान – नाते माणुसकीचे ग्रुपच्या निदर्शनास आली आणि काही तासांतच मदतीचा हात पुढे आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्ती राव वानखेडे मानवाडीकर, सचिव गजानन अनंतवार कवानकर, सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे पळसेकर, प्रभाकर दहिभाते आदींनी कन्यादान, अन्नदान तसेच विवाहासाठी लागणारे साहित्य, गादी-पलंग, टेंट, आचारी, बॅण्ड आदी सर्व बाबींसाठी सोशल मीडियावर आवाहन केले. विशेष म्हणजे...
error: Content is protected !!