Collector Abhijit Raut : गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करा – जिल्हाधिकारी अभिजित राऊत – NNL
नांदेड| बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) अर्थात कुत्रीम बुध्दीमत्ता वापरुन दैनंदिन कामे अधिक गतीमान व अचूक करण्यावर भर देण्यात येत आहे.माध्यम प्रतिनिधीनीही गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेने पत्रकारितेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करावा, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात आज सोमवारी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, विविध पत्रकार संघटना व जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पण दिनाला पुष्पांजली अर्पण केल्यानंतर त्यांनी आज पत्रकारांसाठी आयोजित 'कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बातमीदारी', या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके यांच्यासह नांदेड येथील ज्ये...
