heart-related diseases : ह्रदय रोगाशी संबंधित आजार असलेल्या 95 बालकांची टुडी ईको तपासणी
नांदेड| राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत आयोजित शिबिरात हृदयाचे आजार असलेल्या बालकांची 2 डी इको तपासणी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा रुग्णालय नांदेड येथे नुकतीच करण्यात आली. या शिबिरात नांदेड जिल्ह्यातील एकूण 95 बालकांची तपासणी करण्यात आली असून बालाजी हॉस्पिटल मुंबई येथे मोफत ह्रदय शस्त्रक्रियेसाठी पात्र एकूण 24 बालकांची शस्त्रक्रिया ऑगस्ट महिन्यात करण्यात येणार आहे.
या शिबिरासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चंद्रशेखर अप्पनगिरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाभाऊ बुट्टे यांच्या नेवृत्वात्वाखाली हृदयाचे आजार असलेल्या सदृश्य बालकांची 2 डी इको तपासणी करण्यात आली. ही तपासणी बालाजी रुग्णालय, मुंबई येथील लहान मुलांचे ह्रदयरोग तज्ञ डॉ. जयश्री मिश्रा आणि रुग्णाल...
