Nanded Local Crime Branch : गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेले दोघे जेरबंद – नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
नांदेड| गावठी पिस्तुल विक्री करण्यासाठी आलेल्या दोन इसमांना नांदेड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईत दोन गावठी पिस्तुल, १४ जिवंत काडतुसे व दोन पल्सर मोटारसायकली असा एकूण ₹२,४४,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार "ऑपरेशन फ्लश" अंतर्गत अवैध शस्त्रसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून ही मोहीम राबवण्यात आली. सुरज गुरव (अप्पर पो. अधीक्षक, नांदेड), श्रीमती अर्चना पाटील (अप्पर पो. अधीक्षक, भोकर) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय,पो. उपनि.मिलिंद सोनकांबळे यांनी ही धाडसी कारवाई केली.
गोपनीय माहितीनुसार दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी लोहा येथील शनिमंदिराजवळ आरोपी पिस्तुल विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यावर पोलीसांनी सापळा रचून दोन्ही इसमांना ताब्यात घेत...
