Criminal Arested : पुणे शहरातील खून प्रकरणातील दोन आरोपी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
नांदेड | पुणे शहरात खून करून फरार झालेल्या दोन आरोपींना नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, ही कारवाई नांदेड ग्रामीण पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
अविनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड), मा. श्रीमती अर्चना पाटील (अपर पोलीस अधीक्षक, भोकर), मा. श्री. सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड) तसेच मा. श्री. प्रशांत शिंदे (उपविभागीय पोलीस अधिकारी, इतवारा) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
आरोपी संदीप रंगराव भुरके (वय 28, व्यवसाय – मजुरी, रा. चिखलवाडी, ता. भोकर, जि. नांदेड) ओमप्रकाश गणेश किरकन (वय 24, व्यवसाय – मजुरी, रा. चिखलवाडी, ता. भोकर, जि. नांदेड) यांच्यावर पुणे शहरातील आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 365/2025 अंतर्गत कलम 103(1), 3(5) बी.एन.एस. सह 4/25 भारतीय शस्त्र अधिनियम प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल होता.
दिनांक 22 डिस...
