Friday, June 26

Tag: Tribal community submits a memorandum

Tribal community : हिमायतनगरमध्ये आरक्षण बचाव मोटारसायकल रॅली; आदिवासी समाजाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

Tribal community : हिमायतनगरमध्ये आरक्षण बचाव मोटारसायकल रॅली; आदिवासी समाजाचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर | अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील आरक्षण अबाधित ठेवावे आणि कोणत्याही इतर समाजाला ST प्रवर्गात सामील करू नये, या मुख्य मागणीसाठी हिमायतनगर शहरात आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. क्रांतिसूर्य बिरसा मुंडा चौकातून रॅलीला सुरुवात होऊन तहसील कार्यालयापर्यंत जोरदार घोषणाबाजी करत मोर्चाचे रूपांतर झाले. तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, युवक-युवती आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते यात सहभागी झाले. तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये खालील प्रमुख मागण्या नमूद करण्यात आल्या: बंजारा, धनगर, हटकर, बडगा, कैकाडी, वडार इ. कोणत्याही समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात सामील करू नये. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १२,५२० अधिसंख्य पदे आणि ८५,००० रिक्त पदांची त्वरित भरती करावी. २५ फेब्रुवारी २०२२ रोज...
error: Content is protected !!