Banana-Good : केळी-उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण वर्ग संपन्न
नांदेड| सहकार व पणन विभागाकडून आशियाई विकास बँक अर्थसाहित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, आत्मा व कृषी विभाग नांदेड व हिरकणी बायोटेक अर्धापूर नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने अर्धापूर येथे केळी-उत्तम कृषी पद्धती प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण घेण्यात आले.
नांदेड जिल्हा फळे व भाजीपाला सोसायटीचे चेअरमन धर्मराज देशमुख, केळी संशोधन केंद्राचे डॉ. शिवाजी शिंदे, अर्धापूर तालुका कृषी अधिकारी एस. एस. देवकांबळे, महाकृषी शेतकरी उत्पादक कंपनी उपसर सोलापूरचे व्यवस्थापक नरहर कुलकर्णी, प्रगतशील शेतकरी निलेश देशमुख, हिरकणी बायोटेक व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर देशमुख, केळी तज्ज्ञ हेमंत कदम, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साख...
