Traffic congestion : हिमायतनगर शहरात रस्त्यांवरील अतिक्रमण व अरुंद रस्त्यांमुळे दिवाळीत ट्रॅफिक कोंडी नागरिक व व्यापारी त्रस्त
हिमायतनगर (अनिल मादसवार) दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि रस्त्यांवरील वाढते अतिक्रमण यामुळे दररोज ट्रॅफिक जामची समस्या गंभीर रूप धारण करत आहे.
शहराचा मुख्य प्रवेशमार्ग असलेला परमेश्वर मंदिर कमान ते पळसपूर रस्ता, तसेच सराफा लाईन, बाजार लाईन सह इतर प्रमुख रस्त्यांवर शाळा–कॉलेज सुटण्याच्या वेळेस आणि सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे नागरिक, व्यापारी, वाहनधारक आणि विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांना अडथळे
वाहतुकीच्या कोंडीत अनेकदा अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिका अडकत असून, वेळेत रुग्णालयात पोहोचण्यात अडथळे निर्माण होत आहेत. वाहतुकीतील तणाव आणि गोंधळामुळे अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता वाढली आहे. दिवाळीच्या गर्दीमुळे ही परिस्थिती...
