Kanifnath Temple : कानिफनाथ देवस्थानच्या जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी एकंबा ग्रामपंचायतीने दिला ठराव
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे एकंबा येथील कानिफनाथ महाराज देवस्थानच्या 60 एकर जागेवरील काही भागात अतिक्रमण झाले आहे. सदरचे अतिक्रमण हटवावे ( Ekamba Gram Panchayat passed a resolution to remove encroachment on the land of Kanifnath Temple) अशी मागणी एका निवेदनासह ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन सरपंच, ग्रामस्थांनी हिमायतनगरच्या तहसीलदार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येथील अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हिमायतनगर तालुक्यातील मौजे एकंबा येथे कानिफनाथ देवस्थानाची 60 एकर जमीन आहे. दरवर्षी फाल्गुन दशमीच्या दिवशी नवनाथांपैकी एक असलेल्या कानोबा (कानिफनाथ) महाराजांची यात्रा मोठ्या उत्साहाने भरविण्यात येते. याबाबत जुने जाणकार सांगतात कि, कानिफनाथ महाराजाने आपल्या सातशे शिष्यांसह धर्मप्रचाराचे काम निजामी राजवटीत केलं होते. तेंव्हापासुन दरवर्षी कान्होबाची काठी भ्रमंतीला निघते. विदर्भातील वेग...
